पद्मनाभस्वामी मंदिरातून १८६ कोटींच्या सोन्याची चोरी ?

By Admin | Updated: August 16, 2016 09:44 IST2016-08-16T09:14:15+5:302016-08-16T09:44:25+5:30

केरळमधील प्रसिद्ध पद्मनाभस्वामी मंदिराच्या स्पेशल ऑडीट रिपोर्टमध्ये अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत.

186 crores gold stolen from Padmanabhaswamy Temple? | पद्मनाभस्वामी मंदिरातून १८६ कोटींच्या सोन्याची चोरी ?

पद्मनाभस्वामी मंदिरातून १८६ कोटींच्या सोन्याची चोरी ?

ऑनलाइन लोकमत 

तिरुअनंतपूरम, दि. १६ - केरळमधील प्रसिद्ध पद्मनाभस्वामी मंदिराच्या स्पेशल ऑडीट रिपोर्टमध्ये अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. विनोद राय समितीने केलेल्या मंदिराच्या ऑडीटमध्ये मंदिर व्यवस्थापनामध्ये मोठया प्रमाणावर आर्थिक अनियमितता, भ्रष्टाचार असल्याचे समोर आले आहे. या ऑडीटमध्ये मंदिरातील १८६ कोटी रुपयांचे सोने गायब असल्याचे समोर आले आहे. 
 
पाच भागांमध्ये हा एकहजार पानी अहवाल असून, सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोंबर २०१५ मध्ये राय समितीला ऑडीटपूर्ण करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. शुद्धीकरणाच्या नावाखाली मोठया प्रमाणावर सोने गहाळ झाले असून, ७६९ सोन्याची भांडी गायब आहेत. ज्याची एकूण किंमत १८६ कोटी रुपये आहे. 
 
या आर्थिक गैरव्यवहारांच्या मूळाशी जाण्यासाठी राय यांनी त्यांच्या अहवालात चौकशीची शिफारस केली आहे. शुद्धीकरणामध्ये २.५० कोटी रुपये सोन्याचे नुकसान झाले आहे. मंदिराच्या कारभारात पारदर्शकतेचा अभाव असून, १४.१८ लाख रुपयांच्या सोने आणि चांदीची रजिस्टरमध्ये नोंदणी केलेली नाही. हे बेकायद असल्याचे अहवालात म्हटले आहे. 
 
१४ लाख रुपये किंमतीचे चांदीचे बार गायब आहेत. मंदिर व्यवस्थापनाने १९७० मध्ये बेकायदपद्धतीने २.११ एकर जमिनीची विक्री केली. या व्यवहाराच्या कुठल्याही नोंदी नसल्याचे समोर आले आहे. 
 
 
 

Web Title: 186 crores gold stolen from Padmanabhaswamy Temple?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.