गंगा शुद्धीसाठी १८ वर्षांची ‘ब्लू प्रिंट’

By Admin | Updated: September 23, 2014 04:26 IST2014-09-23T04:26:30+5:302014-09-23T04:26:30+5:30

गंगा नदीच्या शुद्धीकरणासाठी संथगतीने पावले उचलत असल्याबद्दल काही दिवसांपूर्वी नाराजी

18-year-old 'Blue Print' for Ganga Purani | गंगा शुद्धीसाठी १८ वर्षांची ‘ब्लू प्रिंट’

गंगा शुद्धीसाठी १८ वर्षांची ‘ब्लू प्रिंट’

नवी दिल्ली : गंगा नदीच्या शुद्धीकरणासाठी संथगतीने पावले उचलत असल्याबद्दल काही दिवसांपूर्वी नाराजी व्यक्त केल्यानंतर केंद्र सरकारने या पवित्र नदीला गतवैभव प्राप्त करून देण्याचे १८ वर्षांची व हजारो काटी रुपये अपेक्षित खर्चाची ‘ब्लू प्रिंट’ सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सादर केली.
या ‘ब्लू प्रिंट’नुसार केंद्रातील रालोआ सरकारने सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासह एकूणच संपूर्ण स्वच्छतेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी गंगेकाठच्या ११८ शहरांची निवड केली आहे. सकारने सादर केलेले प्रतिज्ञापत्र म्हणते की, गंगेचे पुनरुज्जीवन सुनिश्चित करण्यासाठी विविध कालावधींचे कार्यक्रम ठरविले आहेत. यात तीन वर्षांचा अल्वाधीचा, पाच वर्षांचा मध्यम अवधीचा व १० वर्षांचा दीर्घ मुदतीचा कार्यक्रम असेल. २,२०० किमी लांबीचे गंगेचे संपूर्ण पात्र स्वच्छ करण्याची जबाबदारी प्रामुख्याने गंगेच्या खोऱ्यातील राज्यांची आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: 18-year-old 'Blue Print' for Ganga Purani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.