१८... वाडी... खून

By Admin | Updated: December 18, 2014 22:39 IST2014-12-18T22:39:31+5:302014-12-18T22:39:31+5:30

मित्रांनी केला मित्राचा खून

18 ... wadi ... blood | १८... वाडी... खून

१८... वाडी... खून

त्रांनी केला मित्राचा खून
दवलामेटीतील घटना : आरोपी पसार
वाडी : क्षुल्लक वादातून दोघांनी चाकूने भोसकून त्यांच्या मित्राचा खून केल्याची घटना वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दवलामेटी येथे गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली. घटनेतील दोन्ही आरोपी पसार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
उमेश व्यंकटराव इंगळे (२७, रा. आंबेडकरनगर, आठवा मैल) असे मृत तरुणाचे नाव असून, दीपक समुद्रे व प्रशांत परतेती, अशी आरोपींची नावे आहेत. उमेश, दीपक व प्रशांत हे तिघेही मित्र होत. उमेश हा मालवाहू मिनिडोअरवर चालक म्हण्ूान काम करायचा. तो चालवीत असलेले टाटा एस वाहन गुरुवारी पासिंग करायला नेले असल्याने तो रिकामाच होता. त्यामुळे उमेश हा दीपक व प्रशांतसोबत दिवसभर दारू पित बसला होता. सायंकाळी तिघेही घराकडे निघाले. दरम्यान, ते दीपकच्या घराजवळ पोहोचताच दीपक व प्रशांतने उमेशसोबत वाद घालायला सुरुवात केली. सदर वाद विकोपास जाताच दोघांनीही उमेशवर चाकूने वार केले. त्याला घटनास्थळी जखमी अवस्थेत सोडून दोघेही पळून गेले.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी सदर घटनेची सूचना लगेच वाडी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून उमेशला रुग्णालयात हलविले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दोन दिवसांपूर्वी स्थानिक सराफा व्यावसायिकावर सशस्त्र हल्ला चढविण्यात आला होता. दोन महिन्यांपूर्वी याच परिसरात कुख्यात गुंड रोशन कांबळे याची हत्या करण्यात आली होती. खुनाच्या घटनांमुळे दवलामेटी येथे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी वाडी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. (प्रतिनिधी)
***

Web Title: 18 ... wadi ... blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.