१८... रेती
By Admin | Updated: December 18, 2014 22:39 IST2014-12-18T22:39:29+5:302014-12-18T22:39:29+5:30
(फोटो-उभा)

१८... रेती
(फ ोटो-उभा)अवैध रेतीवाहतुकीचा ट्रॅक्टर जप्तनागपूर : सावनेर तालुक्यातील केळवद पोलिसांनी ढालगाव शिवारात बुधवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास केलेल्या कारवाईमध्ये अवैध रेतीवाहतुकीचा ट्रॅक्टर व रेती जप्त करून ट्रॅक्टरचालकास अटक केली. इम्रान बशीर शेख (२६, रा. संगम सावंगा) असे अटक करण्यात आलेल्या ट्रॅक्टरचालकाचे नाव आहे. ढालगाव शिवारातून रेतीची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच केळवद पोलिसांनी या परिसराची पाहणी केली. त्यात पोलिसांना एमएच-४०/एस-३३०३ क्रमांकाच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये रेती असल्याचे आढळून आले. पोलिसांनी कागदपत्रांची पाहणी केली असता ती रेती विना रॉयल्टी असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे रेतीसह ट्रॅक्टर जप्त करून ट्रॅक्टरचालकास अटक करण्यात आली. या कारवाईमध्ये एकूण १२०० रुपये किमतीच्या १०० घनफूट रेतीसह ४ लाख १२ हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी केळवद पेालिसांनी भादंवि ३७९ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. (प्रतिनिधी)***