सम-विषममुळे वायू प्रदूषणात १८% घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2016 03:15 IST2016-01-20T03:15:03+5:302016-01-20T03:15:03+5:30

केजरीवाल सरकारने नवी दिल्लीत पंधरा दिवसांकरिता राबविलेल्या सम-विषम फॉर्म्युल्यामुळे राजधानीत वायू प्रदूषणाच्या स्तरात १८ टक्के घट झाली असल्याचा दावा एका अमेरिकन संस्थेने केला आहे.

18% reduction in air pollution due to equation | सम-विषममुळे वायू प्रदूषणात १८% घट

सम-विषममुळे वायू प्रदूषणात १८% घट

नवी दिल्ली : केजरीवाल सरकारने नवी दिल्लीत पंधरा दिवसांकरिता राबविलेल्या सम-विषम फॉर्म्युल्यामुळे राजधानीत वायू प्रदूषणाच्या स्तरात १८ टक्के घट झाली असल्याचा दावा एका अमेरिकन संस्थेने केला आहे.
मागील महिन्याच्या तुलनेत जानेवारीमध्ये नॅशनल कॅपिटल रिजन मध्ये वायू प्रदूषणाचा स्तर वाढला असतानाच याच काळात दिल्लीत मात्र वायू प्रदूषणाच्या स्तरात किंचित घट झाल्याचे या पाहणीत आढळून आले आहे. अमेरिकन संस्थेने १ जानेवारी ते १५ जानेवारी या काळात दिल्लीतील वायू प्रदूषणाचा अभ्यास केला.

Web Title: 18% reduction in air pollution due to equation