शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

ईडीविरोधात १८ पक्ष एकवटले, जंतरमंतरवर आज धरणे; काँग्रेसला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 07:00 IST

तेलंगणचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या कन्या के. कविता यांच्या नेतृत्वात विरोधातील १८ पक्षांचे नेते एकत्रित येणार आहेत.

नवी दिल्ली : मोदी सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसला बाजूला ठेवून विरोधकांची मोट बांधण्याचे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आता दिल्लीतही प्रयत्न करणार आहेत. त्यांच्या कन्या के. कविता यांच्या नेतृत्वात विरोधातील १८ पक्षांचे नेते एकत्रित येणार असून ते जंतरमंतरवर शुक्रवारी धरणे देणार आहेत.

काही दिवसांपूर्वी के. चंद्रशेखर राव यांनी हैदराबाद येथे विरोधकांचे संमेलन घेतले होते. यात काँग्रेसला सहभागी करून घेतले नव्हते. आता दिल्लीतही होणाऱ्या आंदोलनात काँग्रेसला बाजूला ठेवले आहे. ईडीतर्फे देशातील विरोधकांच्या विरोधात कारवाई केली जात आहे. या विरोधात दिल्लीतील जंतरमंतरवर धरणे दिले जाणार आहे. या धरणे आंदोलनाचे नेतृत्व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या के. कविता करणार आहेत. या धरणे आंदोलनात विरोधी पक्षातील १८ पक्षांचे नेते सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोण सहभागी?यात धरणे आंदोलनात महाराष्ट्रातील ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी, एनसीपीच्या नेत्या सीमा मलिक सहभागी होणार आहेत. याशिवाय कम्युनिस्ट नेते सीताराम येचुरी, डी. राजा, आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंग यांच्याशिवाय समाजवादी पार्टी, नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते सहभागी होणार आहेत; परंतु या धरणे आंदोलनासाठी काँग्रेसला बाजूला ठेवले आहे.

तरुणांना नोकऱ्या का नाहीत?  जर सरकारी संस्थांच्या प्रमुखांचा कार्यकाळ वाढविला जाऊ शकतो, तर अग्निपथ योजनेंतर्गत भरती झालेल्या तरुणांचा कार्यकाळ का वाढवला जाऊ शकत नाही. तरुणांना नोकऱ्या का नाहीत? अधिक अनुदान व नोकऱ्या देण्याचे आवाहन पंतप्रधानांना करताना सामान्यांना त्रास देऊन तुम्हाला काय मिळते, असा सवालही कविता यांनी केला.

ईडीला सामोरे जाऊ, काहीही चुकीचे केलेले नाहीमला दिल्ली उत्पादन शुल्क धोरणप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) ९ तारखेला हजर होण्याची नोटीस मिळाली. नियोजित आंदोलन करून ईडीला सामोरे जाऊ, आपण काहीही चुकीचे केलेले नाही. के. कविता, भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) नेत्या

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयdelhiदिल्लीK Chandrashekar Raoके चंद्रशेखर राव