18 महिन्याच्या नातवाकडे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंपेक्षा जास्त संपत्ती

By Admin | Updated: October 20, 2016 12:27 IST2016-10-20T12:23:20+5:302016-10-20T12:27:46+5:30

देवांशकडे एकूण 11.57 कोटींची संपत्ती असून चंद्राबाबू नायडू यांची एकूण संपत्ती 3.73 कोटींची आहे, ज्यामध्ये एका जुन्या अॅम्बेसेडर कारचाही समावेश आहे

The 18-month-old grandfather has more wealth than Chief Minister N. Chandrababu Naidu | 18 महिन्याच्या नातवाकडे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंपेक्षा जास्त संपत्ती

18 महिन्याच्या नातवाकडे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंपेक्षा जास्त संपत्ती

ऑनलाइन लोकमत
गुंटूर, दि. 20 - आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना त्यांच्या 18 महिन्याच्या नातवानेच पिछाडीवर टाकलं आहे. देवांशकडे एकूण 11.57 कोटींची संपत्ती असून चंद्राबाबू नायडू यांची एकूण संपत्ती  3.73 कोटींची आहे, ज्यामध्ये एका जुन्या अॅम्बेसेडर कारचाही समावेश आहे. चंद्राबाबू नायडूंचा मुलगा आणि देवाशंचे वडिल नारा लोकेश यांनीच ही माहिती दिली आहे. 
 
देवांशला 9.17 कोटींची संपत्ती त्याची आजी भुवनेश्वरी यांच्याकडून मिळाली असून अभिनेता बाळकृष्ण यांनी 2.4 कोटींची मुदतठेव भेट म्हणून दिली होती. चंद्राबाबू नायडू यांच्याकडे 3.68 कोटींचं घर आहे मात्र त्यांच्यावर बँक ऑफ बडोदाचं 3.6 कोटींचं कर्जदेखील असल्याने त्यांच्याकडे फक्त 67 लाख रुपये आहेत. 
 
चंद्राबाबू नायडूंचा मुलगा लोकेश याने बुधवारी आपल्या कुटुंबाच्या संपत्तीची माहिती घोषित केली. नायडू कुटुंबीय गेल्या सहा वर्षांपासून आपल्या संपत्तीची आणि देणगीदारांची माहिती घोषित करत आहेत. मात्र विरोधी पक्षाने नेहमी हा मुद्दा उचलून वाद निर्माण केला आहे. 
 

 

Web Title: The 18-month-old grandfather has more wealth than Chief Minister N. Chandrababu Naidu