शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील वाहनातून तेलंगणात पुन्हा १८ लाखांची रोकड जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 14:45 IST

दोन आठवड्यांपूर्वी तेलंगाणात दहा कोटींची रोकड पकडण्याची घटना

बी. संदेश, आदिलाबाद : दोन आठवड्यांपूर्वी तेलंगणात दहा कोटींची रोकड पकडण्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी स्थानिक पोलिसांनी नागपूरवरून येणाऱ्या वाहनातून पुन्हा १८ लाख ४४ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम जप्त केली.

तेलंगणात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वत्र चोख नाकेबंदी करून वाहनांची तपासणी केली जात आहे. गुरुवारी पिंपरवाडा टोल प्लाझावर नागपूरवरून आलेल्या एका वाहनाची तपासणी केली असता त्यात १८ लाखांची रोकड आढळून आली. वाहनातील गोसावी नामक व्यक्तीने आपण वैद्यकीय कारणासाठी हैदराबादला जात असून त्या संबंधीचीच ही रोकड असल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र, या उपचारासंबंधीची कोणतीही कागदपत्रे गोसावी पोलिसांपुढे सादर करू शकले नाही. त्यामुळे ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. 

गोसावी यांच्याकडील एम.एच-३५ क्रमांकाचे हे वाहन वर्धा पासिंगचे आहे. त्यामुळे १८ लाखांच्या या रोकडचे कनेक्शन वर्धा-नागपुरात असण्याचा संशय तेलंगाणा पोलिसांना आहे. 

दोन आठवड्यांपूर्वी नागपुरातून आलेल्या वाहनातून याच टोल प्लाझावर दहा कोटी रुपयांची रोकड तेलंगाणा पोलिसांनी जप्त केली होती.

टॅग्स :Telanganaतेलंगणाnagpurनागपूर