राजस्थानमध्ये व्हॅन- ट्रकच्या भीषण धडकेत १८ ठार, ४० जखमी

By Admin | Updated: December 6, 2015 12:11 IST2015-12-06T11:10:16+5:302015-12-06T12:11:26+5:30

राजस्थानच्या प्रतापगड जिल्ह्यामध्ये शनिवारी रात्री एक पीकअप व्हॅन आणि ट्रकची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात १८ जण ठार झाले

18 killed, 40 injured in road accident in Rajasthan | राजस्थानमध्ये व्हॅन- ट्रकच्या भीषण धडकेत १८ ठार, ४० जखमी

राजस्थानमध्ये व्हॅन- ट्रकच्या भीषण धडकेत १८ ठार, ४० जखमी

ऑनलाईन लोकमत 

जयपूर, दि. ६ - राजस्थानच्या प्रतापगड जिल्ह्यामध्ये शनिवारी रात्री एक पीकअप व्हॅन आणि ट्रकची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात १८ जण ठार झाले. तर ४० प्रवासी जखमी झाले. अपघातात मृत्यूमुखी पडलेले सर्वजण मजूर असून, यात ११ महिला आहेत.  काम संपवून हे मजूर पीकअप व्हॅनने त्यांच्या गावी परतत असताना ढोलापानी भागामध्ये हा भीषण अपघात झाला.  

समोरुन वेगात आलेल्या ट्रकने या पीकअपव्हॅनला धड़क दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, १४ जणांचा जागीच मृत्यू झाला. उदयपूर येथील रुग्णालयात नेत असताना वाटेत चौघांचा मृत्यू झाला. १५ जखमींना उदयपूर येथील तर, एकाला प्रतापगड येथील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे. पीकअप व्हॅनमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरले होते. 

Web Title: 18 killed, 40 injured in road accident in Rajasthan