१८... काटोल... चोरी... जोड

By Admin | Updated: December 18, 2014 22:39 IST2014-12-18T22:39:31+5:302014-12-18T22:39:31+5:30

वर्षभरात काटोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ३० मोटरसायकली चोरीला गेल्याची नोंद पोलीस ठाण्यात आहे. त्यामुळे मोटरसायकली चोरणारी टोळी या परिसरात सक्रिय असावी, अशी शक्यता वर्तविली जात होती. दरम्यान, या चोरीमध्ये प्रमोद राऊत आणि राहुल हजारे यांचा सहभाग असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी दोघांनाही मंगळवारी सायंकाळी ताब्यात घेतले. या दोघांनीही मोटरसायकली चोरी केल्याची बाब चौकशीदरम्यान मान्य केली. पोलिसांनी बुधवारी चोरीच्या २० मोटरसायकली विविध ठिकाणांहून जप्त केल्या. यातील १९ मोटरसायकलींची एकूण किंमत पाच लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. यातील एका मोटरसायकलची किंमत १ लाख ५० हजार रुपये असून, ती सचिनने नागपूर येथून चोरल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. या तिन्ही चोरट्यांनी गुरुवारी सकाळी काटोल येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी जी. आर. नंदनवार यांच्या न्यायालयात हजर

18 ... katol ... theft ... pair | १८... काटोल... चोरी... जोड

१८... काटोल... चोरी... जोड

्षभरात काटोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ३० मोटरसायकली चोरीला गेल्याची नोंद पोलीस ठाण्यात आहे. त्यामुळे मोटरसायकली चोरणारी टोळी या परिसरात सक्रिय असावी, अशी शक्यता वर्तविली जात होती. दरम्यान, या चोरीमध्ये प्रमोद राऊत आणि राहुल हजारे यांचा सहभाग असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी दोघांनाही मंगळवारी सायंकाळी ताब्यात घेतले. या दोघांनीही मोटरसायकली चोरी केल्याची बाब चौकशीदरम्यान मान्य केली. पोलिसांनी बुधवारी चोरीच्या २० मोटरसायकली विविध ठिकाणांहून जप्त केल्या. यातील १९ मोटरसायकलींची एकूण किंमत पाच लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. यातील एका मोटरसायकलची किंमत १ लाख ५० हजार रुपये असून, ती सचिनने नागपूर येथून चोरल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. या तिन्ही चोरट्यांनी गुरुवारी सकाळी काटोल येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी जी. आर. नंदनवार यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने या तिघांनाही शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कामगिरी पोलीस निरीक्षक भरत ठाकरे, सहयक पोलीस निरीक्षक अनिल मांडवे, उपनिरीक्षक सचिन राठोड, हवालदार शेषराव राठोड, राजू गजभिये, दिनेश काकडे, पुरुषोत्तम काकडे, कानिफनाथ जाधव, राजिक शेख, भूषण शहाणे, रत्नाकर ठाकरे, निवृत्ती यावले आदींनी बजावली. (तालुका प्रतिनिधी)
----------चौकट--------
विहिरीत टाकल्या दुचाकी
या चोरट्यांनी काही मोटरसायकली पेठ बुधवार येथील सार्वजनिक विहिरीत टाकल्या असाव्यात, अशी शक्यता पेालीस सूत्रांनी व्यक्त केली. या विहिरीत पाणी उपसून मोटरसायकली शोधण्याचे कार्य सुरू करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी सचिनने नागपूर येथून यामाहा कंपनीची महागडी मोटरसायकल चोरली. ती त्याने नरखेड तालुक्यातील तीनखेडा येथे त्याच्या नातेवाइकाकडे ठेवली होती. ती दुचाकी त्याने दोन महिने बाहेर काढली नसल्याने कुणाच्याही निदर्शनास आले नाही, असेही पेालिसांनी सांगितले.
***

Web Title: 18 ... katol ... theft ... pair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.