शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटक विधानसभेत राडा, १८ जण निलंबित; भाजपा आमदारांना उचलून सभागृहाबाहेर काढलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 18:47 IST

गुरुवारी कर्नाटक सरकारचे मंत्री के.एन राजन्ना यांनी सभागृहात केंद्रीय मंत्र्‍यांसह जवळपास ४९ नेते हनीट्रॅपमध्ये अडकलेत असा खळबळजनक दावा केला होता.

बंगळुरू - कर्नाटक विधानसभा अधिवेशनात ४८ नेत्यांच्या हनीट्रॅप प्रकरणी मोठा राडा पाहायला मिळाला. शुक्रवारी या आरोपांवर विधानसभा सभागृहात गोंधळ झाला. भाजपा आमदार विधानसभेच्या वेलमध्ये उतरले. त्यांनी अध्यक्षांच्या खुर्चीकडे पेपर फेकले, ज्यामुळे मार्शल यांना सभागृहात यावं लागलं. या अभूतपूर्व गोंधळानंतर मार्शलने भाजपा आमदारांना उचलून सभागृहाबाहेर काढले. या गोंधळ घालणाऱ्या १८ आमदारांवर ६ महिने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

कर्नाटक सरकारचे संसदीय कामकाज मंत्री एच. के पाटील यांनी १८ भाजपा आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव सभागृहात मांडला. सत्ताधाऱ्यांनी तो पारित करून आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. भाजपा आमदारांना उचलून सभागृहाबाहेर काढणारा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल आहे. या सदस्यांच्या निलंबनावर मंत्री एच. के पाटील म्हणाले की, या सदस्यांनी सभागृहात ज्याप्रकारचे कृत्य केले ते योग्य नव्हते. कुठल्याही विधिमंडळ परंपरेला ते शोभणारे नव्हते. त्यामुळे या सर्वांवर जी निलंबनाची कारवाई झाली ती १०० टक्के योग्य असल्याचं त्यांनी सांगितले.

विधानसभेत हनीट्रॅपच्या मुद्द्यावरून गोंधळ

गुरुवारी कर्नाटक सरकारचे मंत्री के.एन राजन्ना यांनी सभागृहात केंद्रीय मंत्र्‍यांसह जवळपास ४९ नेते हनीट्रॅपमध्ये अडकलेत असा खळबळजनक दावा केला. त्याशिवाय हा मुद्दा केवळ एका पक्षापुरता मर्यादित नाही असंही त्यांनी सांगितले. शुक्रवारी याच मुद्द्यावरून भाजपा आमदारांनी विधानसभा सभागृहात गोंधळ घातला. कारण काही काँग्रेस आमदार हातात सीडी घेऊन त्यांच्याकडे हनीट्रॅपचे व्हिडिओ पुरावे आहेत असा दावा करत होते. 

आमदारांविरोधात मोठं षडयंत्र - भाजपा

दरम्यान, या गोंधळानंतर कर्नाटक विधानसभेचे विरोधी पक्षनेते आर अशोक यांनी सरकारवर निशाणा साधला. हा कुठल्याही एका पक्षाचा मुद्दा नाही, जनतेसाठी काम करणाऱ्या आमदारांविरोधात मोठं षडयंत्र आहे. काही लोक आपला अजेंडा रेटण्यासाठी हनीट्रॅप करतात असं म्हटलं. त्यावर हनीट्रॅप प्रकरणात कुणालाही वाचवण्याचा प्रश्नच नाही. कायद्यानुसार या प्रकारातील दोषींना शिक्षा मिळेल असं आश्वासन मुख्यमंत्री सिद्धाराम्मया यांनी सरकारचा बचाव करताना दिले. 

टॅग्स :BJPभाजपाKarnatak Politicsकर्नाटक राजकारण