18 बंडखोरांविरुद्ध जदयूचा आसूड
By Admin | Updated: June 22, 2014 01:40 IST2014-06-22T01:40:02+5:302014-06-22T01:40:02+5:30
पोटनिवडणुकीत सत्तारूढ पक्षाच्या उमेदवारांविरुद्ध मतदान करणो व अन्य मतदारांना तसे करण्यास बाध्य केल्याबद्दल जदयू आपल्या 18 बंडखोर आमदारांवर आसूड ओढण्याचे संकेत आहेत.

18 बंडखोरांविरुद्ध जदयूचा आसूड
>पाटणा : बिहार राज्यसभेच्या 19 जून रोजी झालेल्या पोटनिवडणुकीत सत्तारूढ पक्षाच्या उमेदवारांविरुद्ध मतदान करणो व अन्य मतदारांना तसे करण्यास बाध्य केल्याबद्दल जदयू आपल्या 18 बंडखोर आमदारांवर आसूड ओढण्याचे संकेत आहेत.
बिहारचे विधिमंडळ कामकाजमंत्री श्रवण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आमदारांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याबाबतचा एक अहवाल पक्षाचे अध्यक्ष शरद यादव, माजी मुख्यमंत्री नितीशकुमार, मुख्यमंत्री जीतनराम मांझी व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष वसिष्ठ नारायण सिंग यांना सोपविण्यात आला आहे.
जीतनराम मांझी मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर नाखुश असलेल्या या आमदारांनी जदयूच्या उमेदवारांविरुद्ध उभ्या असलेल्या अपक्ष उमेदवारांना मतदान केले होते. या आमदारांविरुद्ध कारवाईचा निर्णय पक्षाचे ज्येष्ठ नेते घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. (वृत्तसंस्था)