१८... कोंबडबाजार
By Admin | Updated: December 18, 2014 22:39 IST2014-12-18T22:39:32+5:302014-12-18T22:39:32+5:30
चारगाव शिवारातील कोंबडबाजारावर धाड

१८... कोंबडबाजार
च रगाव शिवारातील कोंबडबाजारावर धाड१३ जणांना अटक : अंदाजे तीन लाख रुपयांचा ऐवज जप्तनागपूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चारगाव शिवारात सुरू असलेल्या कोंबडबाजारावर बुधवारी रात्री धाड टाकली. यात एकूण १३ जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून रोख रकमेसह एकूण दोन लाख ९७ हजार २९० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.विनोद मारोतराव चरपे (३०, रा. बुटीबोरी), रविदास ठाकरे (५५, रा. चारगाव), महादेव भगवान राऊत (५२, रा. देवळी सावंगी), विजू रतिराम ठाकरे (२२, रा. चारगाव), कृष्णा नत्थू तेलरांधे (४५, रा. बेला), एकनाथ चिंधू वाघाडे (४५, रा. चारगाव), कवडू बाबूराव रेवाडे (३५, रा. सातगाव), चरण बाबूराव वलके (२५, रा. चारगाव), मिलिंद शत्रुघ्न टेंभरे (२७, रा. नागपूर), एकनाथ तुळशीराम देव्हारे (५३, रा. हिंगणा), राहुल शंकर म्हैसकर (२२,रा. बेला), सुनील गोविंद अंबाडरे (३८, रा. बुटीबोरी), मधुकर तुकाराम वाघाडे (४५, रा. सालईटोली) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बेला परिसरात गस्तीवर असताना त्यांना चारगाव शिवारात कोंबडबाजार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे पथकाने त्या ठिकाणी धाड टाकली. यात सदर १३ ही आरोपी कोंबड्यांच्या झुंजीवर पैसे लावत असल्याचे आढळून आले. त्यामुळे सर्वांना लगेच अटक करून त्यांच्याकडून ५१ हजार २९० रुपये रोख, सात मोबाईल हॅण्डसेट, चार वाहने, जखमी कोंबडे, काती व इतर साहित्य असा एकूण दोन लाख ९७ हजार २९० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.या प्रकरणी बेला पोलिसांनी मुंबई जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. ही कामगिरी गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर, उल्हास भुसारी, मदन आसटकर, अमोल वाघ, विशाल चव्हाण, विनोद भोयर, रवींद्र जाधव, प्रीतेश नारनवरे, नीतेश रोहणकर, शैलेश बनोडे आदींनी बजावली. (प्रतिनिधी)***