झारखंडमध्ये आढळले १८ कॅनबॉम्ब

By Admin | Updated: February 6, 2015 22:35 IST2015-02-06T22:35:27+5:302015-02-06T22:35:27+5:30

मोठा अनर्थ टळला

18 Canabomb found in Jharkhand | झारखंडमध्ये आढळले १८ कॅनबॉम्ब

झारखंडमध्ये आढळले १८ कॅनबॉम्ब

ठा अनर्थ टळला
खुंटी : झारखंडच्या खुंटी या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील कुछा मार्गावर १८ कॅनबॉम्ब आढळल्याने खळबळ उडाली आहे. सुरक्षा दलांच्या जवानांना लक्ष्य बनविण्यासाठी नक्षलवाद्यांनीच हे बॉम्ब पेरून ठेवल्याचा पोलिसांचा संशय आहे.
सुरक्षा दलाच्या जवानांना फडिंगा-तुरांग गावांदरम्यानच्या रस्त्यावर एक तार पडलेली दिसली. त्यावरून या बॉम्बचा शोध घेण्यात आला. ही तार थेट बॉम्बला जोडलेली होती. या प्रत्येक कॅनबॉम्बमध्ये १५ ते २० किलो वजनाची स्फोटके भरलेली आढळून आली. हे सर्व बॉम्ब निष्प्रभ करण्यात आले आहेत.
दरम्यान या भागात नक्षलवादी दडून बसल्याचा संशय असून सुरक्षा दलांचे जवान त्यांचा शोध घेत आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: 18 Canabomb found in Jharkhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.