शहरं
Join us  
Trending Stories
1
निसर्गाचा कोप! अफगाणिस्तानात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार; १७ जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील ५ जण गाडले गेले
2
१ फेब्रुवारीपासून सिगारेट महागणार; ब्रँड अन् लांबीवरून ठरणार किंमत
3
कर्नाटकात बॅनर वादातून रक्तरंजित खेळ! दोन आमदारांच्या समर्थकांमध्ये हाणामारी; गोळीबारात एकाचा मृत्यू
4
अखेरच्या क्षणी महिंद्राची टाटाला ओव्हरटेक! तिसऱ्या नंबरवर फेकली गेली; किया, एमजीची चांगली कामगिरी...
5
माओवादी कमांडर बारसे देवा पोलिसांना शरण! ‎​हिडमाच्या खात्म्यानंतर नक्षली बॅकफूटवर: तेलंगणात केले आत्मसमर्पण
6
२०२६चा पहिला गजकेसरी राजयोग: ८ राशींना सुबत्ता, पद-पैसा वाढ; लक्षणीय यश, ३ दिवस वरदान काळ!
7
फास्टॅग वापरकर्त्यांना नवीन वर्षात मोठे गिफ्ट! १ फेब्रुवारीपासून 'KYV' ची कटकट संपणार; NHAI चा मोठा निर्णय
8
२०२६ची पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी: ३ गोष्टी करा, बाप्पा संकट दूर करेल; सगळे मनासारखे होईल!
9
एक चूक आणि बँक अकाउंट रिकामं! सायबर फसवणूक करणाऱ्यांच्या ५ पद्धती जाणून घ्या अन् काळजी घ्या
10
वाढदिवसाच्या दिवशीच शिवसेना नेत्याच्या लेकीचा अंत; बाथरूममधील 'त्या' एका चुकीने घात केला
11
अनेक बचत खात्यांचा सापळा; जास्त बचत खात्यांमुळे नेमका फटका कसा बसतो?
12
नैनीतालमध्ये गर्लफ्रेंडसोबत फिरत होता नवरा, अचानक समोर आली बायको; मग जे झालं...
13
१ फेब्रुवारी २०२६ पासून सिगरेट महागणार, कोणत्या Cigarette ची किती वाढणार किंमत?
14
Indian Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,४२० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
15
एअर इंडियाच्या पायलटचा कॅनडात 'हायव्होल्टेज' ड्रामा; उड्डाणापूर्वीच झिंगला, मग जे घडलं ते धक्कादायक!
16
कर महसुलात महाराष्ट्रच ‘किंग’; देशाच्या एकूण तिजोरीत २२% वाटा एकट्या महाराष्ट्राचा
17
‘फॅमिली फर्स्ट’! शिंदेसेनेच्या मुंबईतील उमेदवारांत नेत्यांच्या नातेवाईकांचाच भरणा; माजी आमदार चक्क नगरसेवक पदासाठी रिंगणात 
18
कर्जाच्या जाळ्यात अडकली तरुणाई, विना गॅरंटी कर्जाची थकबाकी वाढतेय; बँकांवर ताण - आरबीआय
19
फडणवीस-शिंदे यांचा उद्या मुंबईत संयुक्त मेळावा, मुंबई महापालिका निवडणूक प्रचाराचा नारळ फुटणार
20
ग्रंथदिंडीतून साहित्याचा जागर; तब्बल ५६ चित्ररथांच्या दोन किलोमीटर ग्रंथदिंडीने फेडले डोळ्याचे पारणे
Daily Top 2Weekly Top 5

Video: 17.5 कोटींचं इंजेक्शन; चिमुकल्या कनवची CM केजरीवालांनी घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 18:23 IST

लहानग्या कनवला जीवघेणा आजार जडला असून त्याच्यावरील उपचारा खर्च तब्बल १७.५ कोटी रुपये एवढा आहे.

नवी दिल्लीदिल्लीचेमुख्यमंत्रीअरविंद केजरीवाल हे जनतेप्रती असलेल्या संवेदनशील आणि उपक्रमशील कार्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. दिल्लीच्या जनतेला सरकारकडून सर्वाधिक फायदा देण्याचा आणि त्याचा लाभ गरिबांना तत्परतेनं मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आज केजरीवाल यांनी जेनिटीक आजाराने ग्रस्त असलेल्या चिमुकल्या कनवची त्याच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी, त्याच्या पालकांची आस्थेवाईकपणे चौकशी करत कनवसमवेतही काही वेळ घालवला. मुख्यमंत्र्यांनी स्वत: या भेटीचा व्हिडिओ शेअर केला आहे.

लहानग्या कनवला जीवघेणा आजार जडला असून त्याच्यावरील उपचारा खर्च तब्बल १७.५ कोटी रुपये एवढा आहे. त्यामुळे, या उपचाराच्या खर्चासाठी आम आदमी पक्षाने पुढाकार घेत त्याच्या पालकांना क्राऊड फंडींगच्या माध्यमातून मदत केली. जगभरातील १० हजार मुलांना हा आजार असून भारत देशातील ९ मुलांना हा आजार जडला असून त्यात कनवही एक असल्याची माहितीही यावेळी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिली.

कनवचा जन्म झाल्यापासूनच त्याला SMA नावाचा जेनेटीक आजार आहे. ह्या आजारामुळे शरीराच्या पायापासून ते वरपर्यंतचा सर्वभाग हळू हळू निकामी होत जातो. या आजारामुळे कनवच्याही पायापासूनचा भाग निकामी होत चालला होता. मात्र, क्राऊड फंडींगच्या माध्यमातून १७.५ कोटी रुपये जमा करुन त्याला त्यावरील इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर, त्याच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत आहे. 

आपचे खासदार संजीव अरोरा यांनी इंजेक्शनचे पैसे जमा करण्यासाठी मोठी मेहनत घेतली. त्यांमुळेच आणि दानशूर लोकांमुळेच कनवला इंजेक्शन देण्यात आले आणि नवं जीवनदान मिळाले. कनवच्या प्रकृतीत हळू हळू सुधारणा होत असून यासाठी मदत करणाऱ्या सर्व दानशूर व्यक्तींचे, मीडियाचे, सर्व मदतनीसांचे मी मनापासून आभार मानतो, असेही केजरीवाल यांनी म्हटले. तसेच, कनवच्या पुढील स्वास्थपूर्ण आणि निरोग आयुष्यासाठी प्रार्थनाही केल्याचं सांगितलं. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्लीSocial Mediaसोशल मीडियाChief Ministerमुख्यमंत्रीhospitalहॉस्पिटल