१७३ पक्ष्यांच्या प्रजाती धोक्यात
By Admin | Updated: July 28, 2014 02:25 IST2014-07-28T02:25:21+5:302014-07-28T02:25:21+5:30
भारतात आठ नव्या प्रजातींसह एकूण १७० पेक्षा अधिक पक्ष्यांच्या प्रजाती नामशेष होण्याचा धोका आहे़

१७३ पक्ष्यांच्या प्रजाती धोक्यात
कोलकाता : भारतात आठ नव्या प्रजातींसह एकूण १७० पेक्षा अधिक पक्ष्यांच्या प्रजाती नामशेष होण्याचा धोका आहे़ इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन आॅफ नेचरने २०१४ ची ‘रेड लिस्ट’ तयार केली आहे़ यात हा धोक्याचा इशारा देण्यात आला आहे़
या यादीनुसार, नामशेष होण्याचा धोका असलेल्या पक्ष्यांच्या यादीत आठ नव्या प्रजातींचा समावेश करण्यात आला आहे़ यात मानेवर तुरा असलेला करकोचा, अंदमान पाणकोंबडा, अंदमानचे हिरवे कबूतर, पिवळ्या डोळ्याचे हिरवे कबूतर, लाल डोके असलेला बहिरी ससाणा, हिमालयीन ग्रिफीन, दाढी असलेले गिधाड व युन्ना नाटहेच आदी पक्ष्यांचा समावेश आहे़ पक्ष्यांच्या नैसर्गिक घरांवर मानवी अतिक्रमण होत आहे. नैसर्गिक अधिवासाच्या सुरू असलेल्या विनाशामुळे पक्ष्यांची संख्या घटत असल्याचे यात म्हटले. (वृत्तसंस्था)