स्वाईन फ्लूचे देशात १७०० बळी
By Admin | Updated: March 15, 2015 23:12 IST2015-03-15T23:12:08+5:302015-03-15T23:12:08+5:30
गत २४ तासांत स्वाईन फ्लूने आणखी ३६ जणांचा बळी घेतला. याचसोबत स्वाईन फ्लू बळींची संख्या १७०० वर पोहोचली. आतापर्यंत देशभरातील ३० हजार लोकांना एच१ एन१ विषाणूची लागण झाली आहे.

स्वाईन फ्लूचे देशात १७०० बळी
नवी दिल्ली : गत २४ तासांत स्वाईन फ्लूने आणखी ३६ जणांचा बळी घेतला. याचसोबत स्वाईन फ्लू बळींची संख्या १७०० वर पोहोचली. आतापर्यंत देशभरातील ३० हजार लोकांना एच१ एन१ विषाणूची लागण झाली आहे.
आरोग्य मंत्रालयाने रविवारी या संदर्भातील आकडेवारी जारी केली. १४ मार्चपर्यंत १७१० लोकांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आणि २९,५५८ लोकांना याची लागण झाली. काल शनिवारी बळींचा आकडा १६७४ होता, तर बाधितांची संख्या २९,१०३ होती. गुजरातेत स्वाईन फ्लूने सर्वाधिक कहर केला असून, ३८२ लोकांचा बळी घेतला. महाराष्ट्रात हा आकडा २८८, तर मध्य प्रदेशात २३७ आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)