अबब! १७ वर्षांच्या तरुणाला गुगलचं १.२५ कोटीचं पॅकेज; १८ व्या वर्षी पॅकेज २ कोटींचं होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 05:22 AM2022-03-30T05:22:30+5:302022-03-30T05:23:51+5:30

तरुणाची सायबर एक्सपर्ट पदावर नियुक्ती

17 year old youth from Sonepat appointed cyber security expert in Google, got a package of 1.25 crores | अबब! १७ वर्षांच्या तरुणाला गुगलचं १.२५ कोटीचं पॅकेज; १८ व्या वर्षी पॅकेज २ कोटींचं होणार

अबब! १७ वर्षांच्या तरुणाला गुगलचं १.२५ कोटीचं पॅकेज; १८ व्या वर्षी पॅकेज २ कोटींचं होणार

googlenewsNext

- बलवंत तक्षक

चंडीगड : हरयाणातील सोनिपत जिल्ह्यातील खरखौदा भागातील रिढाऊ गावातील तरुण गहलावत याला गुगलने १.२५ कोटी रुपयांचे पॅकेज दिले आहे. या तरुणाची सायबर एक्सपर्ट पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या तरुणाचे वय आहे केवळ १७. 

रिढाऊ गावातील ग्रामस्थांनी या तरुणाच्या सत्कारासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर या तरुणाचे पॅकेज दोन कोटी होणार आहे. गुगलच्या सायबर सेक्युरिटी ॲनेलिस्ट पदासाठी त्याने अर्ज केला होता. निवड झाल्यानंतर त्याला सहा महिन्याचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण झाल्यानंतर त्याने सायबर सेक्युरिटी एक्सपर्टची परीक्षा दिली. यात तो पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. या परीक्षेत त्याला एक लाखापैकी ९८ हजार गुण मिळाले. अमेरिकेतील कॅलिफोर्नियास्थित गुगल मुख्यालयात हा तरुण आता सायबर सेक्युरिटी एक्सपर्ट म्हणून काम करणार आहे. या परीक्षेत दुसऱ्या क्रमांकावर ब्राझिलची मुलगी होती. तिचा स्कोअर ३७ हजार होता. 

Web Title: 17 year old youth from Sonepat appointed cyber security expert in Google, got a package of 1.25 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :googleगुगल