ब्लड कॅन्सरशी लढा देणारी 'ती' एक दिवसासाठी बनली पोलीस आयुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 08:37 AM2019-10-30T08:37:47+5:302019-10-30T08:38:26+5:30

अशाच एका 17 वर्षांच्या कर्करोग झालेल्या मुलीनं स्वतःची इच्छा पूर्ण केली.

17 year old girl suffering from blood cancer, was made Commissioner of Rachakonda Police for a day | ब्लड कॅन्सरशी लढा देणारी 'ती' एक दिवसासाठी बनली पोलीस आयुक्त

ब्लड कॅन्सरशी लढा देणारी 'ती' एक दिवसासाठी बनली पोलीस आयुक्त

googlenewsNext

तेलंगणाः कर्करोग(ब्लड कॅन्सर) म्हणजे मृत्यूची चाहूल ही भीती समाजमनात खोलवर दडून बसली आहे. हा रोग जीवघेणा असल्यानं त्याची लक्षण आढळल्यास भल्याभल्यांची भंबेरी उडते. अशाच एका 17 वर्षांच्या कर्करोग झालेल्या मुलीनं स्वतःची इच्छा पूर्ण केली. तेलंगणातल्या राचाकोंडा पोलिसांनी कर्करोगाशी लढा देणाऱ्या 17 वर्षीय मुलीला एक दिवसासाठी पोलीस आयुक्त बनवलं असून, तिचं पोलीस अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे. 

17 वर्षीय रम्या सांगते, मला एक दिवस पोलीस आयुक्त होण्याचा मान मिळाल्यामुळे अत्यानंद झाला आहे. रम्या 12वीत सायन्स शाखेत शिकत आहे. रम्या पोलीस आयुक्तांच्या खुर्चीवर बसली आणि तिनं अधिकाऱ्यांना आदेश दिले. विशेष म्हणजे अधिकाऱ्यांनीही तिच्या आदेशांचं पालन केलं. मी आज फार खूश आहे. भविष्यात तिला पोलीस अधिकारी बनून परिसरातील कायदा सुव्यवस्था आणि ट्रॅफिकची समस्या सोडवायची आहे.


तसेच महिलांवर होणारे अत्याचार कमी करण्यासाठीही मी प्रयत्नशील राहीन, असंही तिने सांगितलं. रम्यावर हैदराबादेतल्या एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एवढ्या लहान वयात कर्करोगानं पछाडल्यानं तिला पुढं काय होईल याची काहीही कल्पना नाही. पण तिला जो कोणी जाऊन भेटतो, त्याला ती स्मित हास्यानं पोलीस अधिकारी बनून देशाची सेवा करायची असल्याचं सांगते. राचाकोंडा जिल्ह्यातील आयपीएस महेश भागवत आणि ऍडिशनल कमिश्नर सुधीर बाबूंनी रम्या लवकरात लवकर बरी व्हावी, अशी देवाकडे प्रार्थना केली. या प्रसंगी रम्याला गार्ड ऑफ ऑनर प्रदान करण्यात आला आहे.  

Web Title: 17 year old girl suffering from blood cancer, was made Commissioner of Rachakonda Police for a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.