१७... यात्रा... सावनेर
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:14+5:302015-02-18T00:13:14+5:30
सावनेर

१७... यात्रा... सावनेर
स वनेरशहरातील पहलेपार येथील प्राचीन शिवमंदिर आणि सावनेर-छिंदवाडा मार्गावरील शिवमंदिरात भाविकांनी भगवान शंकराचे दर्शन घेतले. सकाळपासून या दोन्ही मंदिरात भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. शहरातील विविध सामाजिक संघटना व व्यापारी प्रतिष्ठानांच्यावतीने भाविकांसाठी चहा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. परिसरातील श्री क्षेत्र महादेव चौरागड संस्थान (नवनाथ तेलंगखेडी) येथे दरवर्षर्ी महाशिवरात्रीनिमित्त मोठी यात्रा भरते. यंदाही येथे भक्तांची चांगलीच गर्दी होती. सदर मंदिर निसर्गाच्या सान्निध्यात पहाडावर कोलार धरणाच्या काठावर आहे. यात्रेनिमित्त प्रसाद वितरण, फराळ, चहा व महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.----केळवदस्थानिक श्री कपिलेश्वर मंदिर परिसरात यात्रा भरली होती. दरम्यान, सकाळपासून भाविकांनी दर्शन घेण्यासाठी रांगा लावल्या होत्या. यावेळी महाप्रसादाचे वितरण करण्यात आल. केळवद पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.---