१७...यात्रा... कामठी
By Admin | Updated: February 18, 2015 00:12 IST2015-02-18T00:12:59+5:302015-02-18T00:12:59+5:30
कामठी

१७...यात्रा... कामठी
क मठी जुनी कामठी येथील कामठेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त हजारो भाविकांनी श्री शंकराचे दर्शन घेतले. पहाटे ५ वाजता अभिषेक करण्यात आला. त्यानंतर सकाळी ७ वाजतापासून मंदिरात दर्शनाला सुरुवात झाली. काही भाविक खांद्यावर त्रिशूळ घेऊन वाजतगाजत दर्शनासाठी आले होते. हर हर महादेवच्या जयघोषाने आसमंत दुमदुमला होता. भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाने उत्तम व्यवस्था केली. पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. कामठी-कन्हान माार्गवरील आडापूलस्थित श्री साईबाबा मंदिर येथेही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. मंदिर पंचकमिटीचे अध्यक्ष श्रीकृष्ण देवनाथ बाबा यांच्या हस्ते पूजा करून कन्हान नदीवरील महादेवघाट येथून कावड यात्रेला सुरुवात करण्यात आली. या कावडीत आणलेल्या पाण्याने जलाभिषेक करण्यात आला. यावेळी उमाशंकर सिंग, गणेश यादव, मनोहर मसूरकर, राजू पंडित, दिलीप बडवाईक, रवी कोतपल्लीवार, प्रणय राखडे आदी उपस्थित होते.***