१७... यात्रा... जलालखेडा
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:13+5:302015-02-18T00:13:13+5:30
जलालखेडा

१७... यात्रा... जलालखेडा
ज ालखेडानरखेड तालुक्यातील जलालखेडा येथील श्री सोमेश्वराच्या मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी सकाळपासूनच गर्दी केली होती. सकाळी श्री सोमेश्वराची पूजा व अभिषेक करण्यात आला. महाप्रसादाचेही वितरण करण्यात आले. यावेळी मंदिर व्यवस्थापन समितीच्यावतीने आ. आशिष देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. स्थानिक ग्रामपंचायतच्यावतीने भाविकांसाठी विविध मूलभूत सुविधा पुरविण्यात आल्या.----मन्नाथेश्वरनरखेड तालुक्यातील मन्नाथेश्वर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. सदर मंदिर हेमाडपंथी असून, ते घोगरा येथील जंगलात आहे. त्यामुळे भाविकांनी महादेवाचे दर्शन घेत निसर्गाचाही आनंद लुटला.---