१७... रामटेक... तणाव
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:21+5:302015-02-18T00:13:21+5:30
नागार्जुन, त्रिशूळ प्रकरणामुळे तणाव

१७... रामटेक... तणाव
न गार्जुन, त्रिशूळ प्रकरणामुळे तणावप्रशासनाची कुशल भूमिका : भाविकांनी घेतले दर्शन रामटेक/काचूरवाही : स्थानिक नागार्जुन टेकडीसंबंधीचा हिंदू व बौद्ध बांधवांमधील वाद मागील काही वर्षांपासून सुरू आहे. शिवरात्रीला मंदिरात त्रिशूळ नेताना विरोध केला जातो. सदर प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. मंगळवारी मंदिरात त्रिशूळ नेण्याचा व त्याला विरोध करण्याचा प्रकार घडला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, प्रशासनाने परिस्थिती कुशलतेने हाताळल्याने तणाव निवळला. त्रिशूळ मंदिरात गेला नसला तरी भाविकांना दर्शनासाठी मनाई करण्यात आली नव्हती. अंदाजे १५ वर्षांपासून हा वाद सुरू आहे. अज्ञात समाजकंटकाने शिवमंदिरातील नंदी चोरून नेल्याने हा वाद निर्माण झाला तो अद्यापही सुरूच आहे. दर महाशिवरात्रीला हा वाद उफाळून येतो. माजी आ. आशिष जयस्वाल हे महाशिवरात्रीला मंदिरात वाजतगाजत त्रिशूळ न्यायचे. त्याला विरोध केला जायचा. त्यामुळे हा वाद संवेदनशील बनला. गेल्या तीन वर्षांपासून टेकडीच्या पायथ्याशी प्रशासनाकडून त्रिशूळ अडविला जातो. कारण गडावर त्रिशूळ नेऊ दिल्या जात नाही. तसे न्यायालयाचे आदेश आहेत. दुसरीकडे या त्रिशूळ रोहणाला विरोध करणारी मंडळी मोठ्या संख्येने जमतात. त्यामुळे प्रशासनाला धडकी भरते. यावर्षी बाबासाहेबांचे शेकडो अनुयायी विवादाग्रस्तस्थळी जमले होते. त्यात महिलांचाही समावेश होता. बजरंग दलाच्या नेतृत्वात टेकडीवरील शिवमंदिरात त्रिशूळ नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. संख्येने कमी पण जोशपूर्ण तरुणांनी त्रिशूळ कैलास पुरी महाराजांच्या मठापर्यंत पोहोचविला. त्या ठिकाणीत्तो प्रशासनातर्फे अडविण्यात आला. त्रिशूळ पुढे नेण्यास मज्जाव केल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली. पोलिसांच्या रेटारेटीत राहुल टोंगसे या तरुणाचा शर्ट फाटल्याने त्याला पोलिसांच्या वाहनात बसविण्यात आले. उपविभागीय अधिकारी शेखर सिंग, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दीपक साळुंखे, तहसीलदार प्रसाद मते, पोलीस निरीक्षक आगरकर, उपनिरीक्षक भालेकर आदींनी तरुणांना थांबवून परिस्थिती हाताळली. भाविकांना दर्शनासाठी वाट मोकळी करून देण्यात आली होती. दुसऱ्या बाजूच्या नागरिकांनी सहकार्याची भूमिका घेतल्याने तणाव निवळला. माजी आ. जयस्वाल मात्र यावर्षी नागार्जुन टेकडीकडे फिरकले नाही. शिवरात्रीलाच जाणे काही गरजेचे नाही. आपण केव्हाही त्रिशूळ घेऊन शिवमंदिरात जाऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी/वार्ताहर)***