दिल्ली विधानसभेत १७ पदव्युत्तर, २९ पदवीधर आमदार
By Admin | Updated: February 11, 2015 23:19 IST2015-02-11T23:19:48+5:302015-02-11T23:19:48+5:30
नवी दिल्ली: भाजपा आणि काँग्रेसला जबर धक्का देत, दिल्ली विधानसभेत पोहोचलेल्या आम आदमी पार्टीच्या ६७ आमदारांमध्ये बहुतांश आमदार उच्चशिक्षित आहेत़ मनीष सिसोदिया, राखी बिडलान यांच्यासह १७ नवनिर्वाचित आमदार पदव्युत्तर असून २९ पदवीधर आहेत़ केवळ पाच आमदार दहावीपेक्षा कमी शिकलेले आहेत़

दिल्ली विधानसभेत १७ पदव्युत्तर, २९ पदवीधर आमदार
न ी दिल्ली: भाजपा आणि काँग्रेसला जबर धक्का देत, दिल्ली विधानसभेत पोहोचलेल्या आम आदमी पार्टीच्या ६७ आमदारांमध्ये बहुतांश आमदार उच्चशिक्षित आहेत़ मनीष सिसोदिया, राखी बिडलान यांच्यासह १७ नवनिर्वाचित आमदार पदव्युत्तर असून २९ पदवीधर आहेत़ केवळ पाच आमदार दहावीपेक्षा कमी शिकलेले आहेत़निवडणूक आयोगाकडे दाखल प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली आहे़ नियोजित मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, अल्का लांबा, सोम दत्त, सत्येन्द्र जैन, राजेश ऋषी, वेदप्रकाश, आसिफ अहमद खान आणि इमराल हुसैन यांच्यासह आम आदमी पार्टीचे २९ पदवीधर आमदार पदव्युत्तर आहेत़ तर गोपाल राय, सोमनाथ भारती, मनीष सिसोदीया, राखी बिडलान आदी १७ नवनिर्वाचित आमदार पदवीधर आहेत़ पाच आमदार बारावी उत्तीर्ण आहेत़माजी केंद्रीय मंत्री कृष्णा तीरथ यांचा पटेलनगर येथून पराभव करणारे हजारीलाल चौहान हे नववी शिकलेले आहेत़ तर सलीमपूर येथून निवडून आलेले मोहम्मद इशराक यांचे केवळ प्राथमिक शिक्षण झालेले आहे़आप आमदार नरेश बलयान, राजू धिंगन आणि अवतार सिंह हेही नववीपर्यंत शिकलेले आहे़ विकासपुरी भागातून सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले महेंद्र यादव हे दहावी उत्तीर्ण आहेत़ भाजपा उमेदवार योगेंद्र चंडोलिया यांचा करोल बाग मतदारसंघातून पराभव करणारे आप नेते विश्वेश राय यांनी पदवीसाठी प्रवेश घेतला आहे़ कृष्णानगर येथून भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांना पराभवाची धूळ चालणारे एस़के़बग्गा हे कायद्याचे पदवीधर असून वाणिज्य पदव्युत्तर आहेत़