शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

१७ पर्यटनस्थळांमध्ये अजिंठा, वेरूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 05:27 IST

अर्थमंत्र्यांची घोषणा। संपूर्ण परिसराचा होणार विकास

नवी दिल्ली : देशातील ज्या महत्त्वाच्या १७ पर्यटनस्थळांना विकसित करून, जागतिक दर्जा देण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी केली, त्यात महाराष्ट्रातील अजिंठा व वेरूळ या जगप्रसिद्ध लेण्यांचा समावेश आहे. जागतिक दर्जाच्या पर्यटनस्थळांमध्ये टाकण्यासाठी त्यांचा व परिसराचा विकास केला जाणार आहे. या १७ स्थळांचा विकास करण्यासाठी अर्थसंकल्पात १,३७८ कोटी ५३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

याखेरीज कर्नाटकातील हम्पी, गोव्यातील कोळवा बीच, राजस्थानातील अजमेरचा किल्ला, बिहारमधील महाबोधी मंदिर यांचाही या १७ ठिकाणांमध्ये समावेश असणार आहे. पर्यटकांमध्येही आताही हीच पर्यटनस्थळे लोकप्रिय आहेत. देश-परदेशांतील पर्यटक यापैकी बहुसंख्य इथे हमखास जातात.

सोमनाथला भाविकांची अधिक गर्दी असते, तर काझीरंगामध्ये वन्यप्राणी पाहण्यासाठीही अनेक पर्यटक जातात. अधिकाधिक पर्यटकांनी जावे, यासाठी तिथे अनेक सुविधा निर्माण केल्या जातील. हॉटेल्स, चांगल्या दर्जाची रेस्टॉरंट्स, विविध सरकारी व खासगी वाहने, मार्गदर्शक, रेल्वे व विमानतळांपासून चांगले रस्ते व वाहनव्यवस्था यांचा त्यात समावेश आहे.मात्र, अनेकांना या पर्यटनस्थळांची माहिती नसल्याने पर्यटन मंडळातर्फे देश-विदेशांत ती देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. प्रत्येक पर्यटनस्थळाची स्वतंत्र वेबसाइट असेल आणि त्यात तिथे पोहोचण्यापासून, राहणे व खाण्याची सर्व माहिती असेल. नेमण्यात येणाऱ्या मार्गदर्शकांची माहितीही त्यात दिली जाईल. परदेशांतील दूतावासांमध्येही या स्थळांची माहिती मिळू शकेल.निर्मला सीतारामन यांनी १७ ठिकाणांचा उल्लेख केला होता, पण त्या ठिकाणांची नावे मात्र त्यांच्या भाषणात नव्हती. मिळालेल्या माहितीनुसार, या १७ ठिकाणांमध्ये आग्रा येथील ताजमहाल व फतेपूर सिक्रीचा किल्ला, दिल्लीतील कुतुबमिनार, हुमायूंची कबर, लाल किल्ला, गुजरातमधील सोमनाथ व ढोलवीरा, खजुराओ (मध्य प्रदेश), महाबलीपूरम (तामिळनाडू), कुमारकोम (केरळ), काझीरंगा (आसाम) यांचाही समावेश करण्यात आला आहे.अजिंठा लेणी इ.स. पूर्व दुसरे ते इ. स. चौथे अशा कालखंडात तयार केल्या आहेत. त्यात एकूण २९ बौद्ध लेणी आहेत.पाचव्या ते दहाव्या शतकात कोरलेल्या वेरूळ लेणी आहेत. कैलाश मंदिराची निर्मिती राष्ट्रकुट राजा कृष्ण याच्या काळात झाली.