जम्मू - काश्मीरमध्ये हिंसाचारात 17 जण जखमी
By Admin | Updated: August 23, 2016 17:21 IST2016-08-23T17:21:51+5:302016-08-23T17:21:51+5:30
शोपीन जिल्ह्यात आंदोलक आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये झालेल्या संघर्षात 17 लोक जखमी झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खो-यात जनजीवन विस्कळीत झाले आहे.

जम्मू - काश्मीरमध्ये हिंसाचारात 17 जण जखमी
>ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 23 - शोपीन जिल्ह्यात आंदोलक आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये झालेल्या संघर्षात 17 लोक जखमी झाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खो-यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. येथील आंदोलनादरम्यान अनेक लोकांचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर शंभरहून अधिक लोकांनी सुरक्षा दलाच्याविरोधात आंदोलन छेडले होते. यावेळी काही समाजकंटकांनी पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांवर दगडफेक केली. यावेळी हिंसक जमावाला रोखण्यासाठी सुरक्षा दलाच्या जवानांनी प्रत्युत्तर देत पॅलेट गनचा वापर केला. यात पॅलेट गनमुळे 17 जण जखमी झाले.
दरम्यान, जखमी झालेल्यांना तात्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. या जखमींपैकी 13 जणांना उपचार झाल्यावर लगेच डिस्चार्ज देण्यात आला. तर चार जणांचा उपचारासाठी श्रीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.