१७ दुर्लक्षित रोग; तोंड देण्यासाठी हवी मदत

By Admin | Updated: February 20, 2015 02:12 IST2015-02-20T02:12:56+5:302015-02-20T02:12:56+5:30

डेंग्यू, ताप, कुष्ठरोग आणि निद्रानाशासह दुर्लक्षित १७ उष्णकटिबंधीय रोगांना तोंड देण्यासाठी अब्जावधी डॉलरची गुंतवणूक करावी, असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे.

17 neglected diseases; Need help to face | १७ दुर्लक्षित रोग; तोंड देण्यासाठी हवी मदत

१७ दुर्लक्षित रोग; तोंड देण्यासाठी हवी मदत

जिनेव्हा : डेंग्यू, ताप, कुष्ठरोग आणि निद्रानाशासह दुर्लक्षित १७ उष्णकटिबंधीय रोगांना तोंड देण्यासाठी अब्जावधी डॉलरची गुंतवणूक करावी, असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे.
जगभरात दरवर्षी या रोगांमुळे ५ लाख लोक दगावतात. जगभरातील १४९ देशांतील तब्बल दीड अब्ज लोक या रोगांनी ग्रस्त आहेत. या रोगांचा मुकाबला करण्यासाठी अतिरिक्त गुंतवणूक केल्यास अनेकांचा जीव वाचविता येईल. तसेच अनेकांच्या नशिबी येणारी विकलांगता आणि यातनाही दूर होतील. याशिवाय या रोगापासून मुक्ती मिळाल्यास उत्पादकतेतही सुधारणा होईल, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले.
देशो-देशींच्या सरकारने यासाठी भरीव गुंतवणूक केल्यास मानवांच्या हालअपेष्टा कमी होतील. आर्थिक लाभाचे वाटेकरी करून गरिबीच्या विळख्यातून जनतेची सुटका करता येईल, असे प्रतिपादन जागतिक आरोग्य संघटनेचे सरसंचालक मार्गारेट चॅन यांनी केले आहे.
दुर्लक्षित १७ उष्णकटिबंधीय रोगासंबंधीच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या खात्याचे प्रमुख असलेले डर्क एंजेल्स यांनी जिनेव्हा येथे पत्रकारांना सांगितले की, आफ्रिकेतील लोक मोठ्या संख्येने या रोगांनी त्रस्त आहेत. उप-सहारा आफ्रिकेतील ४५० दशलक्ष जनतेचे जीवन या रोगांमुळे धोक्यात आहे. लॅटिन अमेरिका, मध्य-पूर्व, मध्य आशिया आणि आशियातही या रोगांचा फैलाव झालेला आहे. एवढेच नाहीतर युरोपीय देशांसोबत जपान आणि अमेरिकेत हे रोग आढळू शकतात. या रोगांचा प्रतिकार आणि उपचार करण्यासाठी २०२० पर्यंत वर्षाकाठी २.९ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली जावी, अशी शिफारस जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. (वृत्तसंस्था)

या रोगांचे निर्मूलन करण्याच्या दृष्टीने अनेक देशांनी पावले उचलली आहेत. २०१३ मध्ये जगभरात निद्रानाशाचे ६,३१४ रुग्ण होते. गेल्या तीन दशकांत वर्षाकाठी या रुग्णांची संख्या आटोक्यात राखण्यात यश आले. नारू, कुष्ठरोग रुग्णांची संख्याही कमी करण्याकामीही प्रगती झाली आहे.

तथापि, दाहक पुरळ या रोगाचा मुकाबला करण्यात फारशी प्रगती झालेली नाही. जिवाणू संसर्गापासून होणाऱ्या या रोगाचे निर्मूलन करणाऱ्या मोहिमेसाठी कैवारी मिळायला हवा.

या रोग निर्मूलन करणारी मोहीम यशस्वीरीत्या राबविण्यासाठी कोणीतरी पुढाकार घेणे जरूरी आहे, असे डर्क एंजेल्स म्हणाले.

Web Title: 17 neglected diseases; Need help to face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.