१७.... खापरखेडा.... खून

By Admin | Updated: February 18, 2015 00:12 IST2015-02-18T00:12:50+5:302015-02-18T00:12:50+5:30

मित्राच्या वडिलाची निघृर्ण हत्या

17 .... khaparkheda .... blood | १७.... खापरखेडा.... खून

१७.... खापरखेडा.... खून

त्राच्या वडिलाची निघृर्ण हत्या
कैचीने भोसकले : साक्षगंध आटोपल्यानंतर घडला प्रकार
खापरखेडा : साक्षगंधासाठी आलेल्या मित्राने क्षुल्लक कारणावरून मित्राच्या वडिलांची कैचीने भोसकून निर्घृण हत्या केली. ही घटना खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चनकापूर येथे सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.
सूर्यपाल फगुनी सूर्यवंशी (५८, रा. चनकापूर, ता. सावनेर) असे मृताचे नाव असून, सिद्धू गरिबा वर्मा (३२, रा. पैलानी, जिल्हा बादा, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सूर्यपाल हे चनकापूर येथे टेलरचा व्यवसाय करायचे. दरम्यान, सोमवारी त्यांचा मुलगा अरविंद (२८) याचे साक्षगंध होते. सूर्यपालचा मोठा मुलगा चेन्नईला रेल्वेत नोकरीला आहे. तो साक्षगंधाच्या कार्यक्रमाला काही कारणास्तव आला नव्हता. सिद्धूचे सासर सिल्लेवाडा येथील असल्याने तो काही दिवसांपूर्वीच त्याच्या साळ्याच्या लग्नासाठी सिल्लेवाडा येथे आला होता. दरम्यान, तो अरविंदच्या घरी सदर कार्यक्रमाला हजर होता.
सदर कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री सूर्यपाल हा त्याच्या कुटुंबीयांसोबत सहज चर्चा करीत बसले होते. त्यातच सिद्धूने त्याच्या गावी परत जावे, अशी सूचना सूर्यपाल यांनी केली. त्यातच आधीच मानसिक तणावात असलेल्या सिद्धूने कुठलाही विचार न करता मशीनवर ठेवलेली कपडे कापण्याची कैची त्यांच्या पोटात भोसकली. हा प्रकार पाहताच सूर्यपाल यांच्या पत्नीने आरडाओरड केली. त्यातच सूर्यपालचे पुतणे रािेहत व रमेश या दोघांनी सिद्धूला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने कैचीने वार करून या दोघांनाही जखमी केले.
थोड्याच वेळात शेजारी घटनास्थळी आले. त्यांनी सिद्धूला पकडून चांगलाच चोप दिला. माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश कंतेवार, ठाणेदार भीमराव टेळे सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सूर्यपालला लगेच नागपुरातील खासगी रुग्णालयात भरती केले. उपचारादरम्यान, मंगळवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यातच सूर्यपालचा पुतण्या अनिल राजकुमार सूर्यवंशी (१९) याने सिद्धूची शेजाऱ्यांच्या तावडीतून सुटका करून त्याला पोलिसांच्या हवाली केले. या प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी सुरुवातीला भादंवि ३०७ अन्वये गुन्हा नोंदविला होता. डॉक्टरांचा अहवाल प्राप्त होताच भादंवि ३०२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. सदर घटनेचा तपास उपनिरीक्षक सुचिता देशमुख, बंडू कोकाटे, गणेश रॉय, विवेक चुटे, हेमंत रंगारी, सुनील भांडेगावकर, ईश्वर चव्हाण, गणेश सोनस्कर करीत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 17 .... khaparkheda .... blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.