१७... कामठी... अपघात
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:31+5:302015-02-18T00:13:31+5:30
बोलेरोच्या धडकेत एक ठार

१७... कामठी... अपघात
ब लेरोच्या धडकेत एक ठारकामठी : भरधाव बोलेरोने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामठी - नागपूर मार्गावर सोमवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली.वामन अभिमन्यू कुकडे (४८, रा. बाबा ले-आऊट, येरखेडा, ता. कामठी) असे मृताचे नाव आहे. वामन कुकडे हे एमएच-४०/एएन-०५६१ क्रमांकाच्या मोटरसायकलने कामठीहून नागपूरकडे पेट्रोल घेण्यासाठी जात होते. दरम्यान, नागपूरहून कामठीकडे भरधाव येणाऱ्या बोलेराने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. अपघात होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत त्यांना लगेच कामठी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती केले. तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सदर बोलेरो पांढरी असून, अंधारामुळे क्रमांक घेणे शक्य झाले नाही, असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या प्रकरणी कामठी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. (तालुका प्रतिनिधी)***