यमुना एक्स्प्रेस वेवरचे 6 बांधकाम व्यावसायिकांचे 17 प्रकल्प रद्द
By Admin | Updated: April 19, 2017 20:38 IST2017-04-19T20:18:33+5:302017-04-19T20:38:23+5:30
इंडस्ट्रिएल डेव्हलपमेंट अथॉरिटी (YEIDA)ने यमुना एक्स्प्रेस वेवर सुरू असलेल्या 6 बिल्डरांच्या 17 प्रकल्पांचं काम रद्द केलं

यमुना एक्स्प्रेस वेवरचे 6 बांधकाम व्यावसायिकांचे 17 प्रकल्प रद्द
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 19 - इंडस्ट्रिएल डेव्हलपमेंट अथॉरिटी (YEIDA)ने यमुना एक्स्प्रेस वेवर सुरू असलेल्या 6 बिल्डरांच्या 17 प्रकल्पांचं काम रद्द केलं आहे. यात गौर सन्स, अजनारा, जेपी ग्रुप आणि ओरिस, इन्फ्रा सारख्या बिल्डरांच्या प्रोजेक्टचा समावेश आहे. मात्र या प्रकल्पांचं बांधकाम बंद झाल्यानं अनेक कामगारांच्या कुटुंबीयांवर बेरोजगारीची कु-हाड कोसळली आहे.
बांधकाम व्यावसायिकांनी आराखडा न आखता हे प्रकल्प मंजूर करून घेतले होते. या प्रकल्पांना सपा आणि बसपाचं सरकार असताना मंजुरी देण्यात आली होती. मात्र योगी सरकारनं हे प्रकल्प रद्द केले आहेत. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांना इमारतीच्या आराखड्याचा नकाशा मंजूर करण्यासाठी आता नव्यानं निविदा टाकावी लागणार आहे. काही बांधकाम व्यावसायिकांनी काही प्लॅटची आधीच बुकिंग करून ठेवली होती. दुसरीकडे जेपी इन्फ्राटेकला यमुना एक्स्प्रेस वे बनवल्याच्या मोबदल्यात सरकारी करारानुसार एक्स्प्रेस वेलगतची 500 हेक्टर जमीन विकसित करण्यासाठी दिली होती.
मात्र नकाशा मंजूर केल्यानंतर प्राधिकरणानं इमारतीच्या बांधकामावर आक्षेप नोंदवला आहे. मात्र बांधकाम व्यावसायिकांनी प्राधिकरणाच्या हरकतीचं उत्तर दिलं नाही. त्यांचा इमारतीचा आराखडा नियोजन विभागातच धूळ खात पडला. नियोजन विभागाच्या हरकतींना दिलेल्या मुदतीत उत्तर न दिल्यास इमारतीच्या बांधकामाचा नकाशा मंजूर होत नाही. तो रद्दबातल समजला जातो.