१७... बेला
By Admin | Updated: December 18, 2014 00:40 IST2014-12-18T00:40:31+5:302014-12-18T00:40:31+5:30
बेल्यात श्री दत्त जन्मोत्सव

१७... बेला
ब ल्यात श्री दत्त जन्मोत्सव बेला : स्थानिक दत्त मंदिरात श्री दत्त जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले. दरम्यान, सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. अरुण मुलमुले यांच्या श्री गुरुचरित्र पारायणाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. बुधवारी माधवराव महाराज व पीयूष गुरुजी यांच्या हस्ते लघुरुद्रास प्रारंभ करण्यात आला. शुक्रवारी रात्री देवराव चिंचूलकर यांचे कीर्तन पार पडले. शनिवारी जिल्हा परिषद सदस्य जयकुमार वर्मा व पंचायत समिती सदस्य शालू मेंढुले यांच्या हस्ते पूजा करून शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. यात स्थानिक व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रविवारी देवराव चिंचूलकर यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. परिसरातील शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यशस्वितेसाठी श्री दत्त जयंती उत्सव समितीच्या सदस्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)***