शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

धक्कादायक !16 वर्षाच्या मुलीचे 65 वर्षाच्या शेखसोबत लावले लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2017 12:16 PM

पैशांसाठी एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे ओमानवरुन आलेल्या 65 वर्षीय शेखसोबत लग्न लावून देण्यात आल्याची धक्कादायक घटना हैदराबादमध्ये समोर आली आहे.

ठळक मुद्देलग्नानंतर या शेखने नववधूसोबत चार दिवस हैदराबादमधल्या हॉटेलमध्ये मुक्कामाला केला. मुलीला लग्नाला तयार करण्यासाठी सिकंदरने तिला ओमानमधले ऐषोआरामी लाईफस्टाईलचे व्हिडीओ दाखवले.

हैदराबाद, दि. 17 - पैशांसाठी एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे ओमानवरुन आलेल्या 65 वर्षीय शेखसोबत लग्न लावून देण्यात आल्याची धक्कादायक घटना हैदराबादमध्ये समोर आली आहे. नवाब साहेब कुंटा येथे राहणारी मुलीची आई सईदा उन्निसाने याप्रकरणी पोलीसात तक्रार दाखल केली असून, मुलीला मस्कतवरुन परत आणण्याची मागणी केली आहे.

उन्निसाने तिच्या तक्रारीत नव-याची बहिण घोसिया आणि नवरा सिकंदरवर आरोप केला आहे. या दोघांनी आपल्या मुलीला लग्नाला भाग पाडले असे तिचा आरोप आहे. हा शेख रमझानच्या आधी हैदराबादला आला होता. मुलीचे शेख बरोबर लग्न लावून द्यायला माझा विरोध होता पण नव-याने काझीच्या मदतीने हॉटेलमध्ये मुलीचे लग्न लावले असे उन्निसाने सांगितले. मी जेव्हा विरोध केला तेव्हा शेखने मला मुलीला 5 लाख रुपयांना विकत घेतले असून सर्व रक्कम सिंकदरला दिल्याचे सांगितले. सर्व रक्कम परत केली तरच, शेख मुलीला भारतात पाठवायला तयार आहे असे उन्निसा म्हणाली. 

मुलीला लग्नाला तयार करण्यासाठी सिकंदरने तिला ओमानमधले ऐषोआरामी लाईफस्टाईलचे व्हिडीओ दाखवले. शेख बरोबर लग्न केल्यास आरामदायी आयुष्य वाटयाला येईल असे स्वप्न दाखवल्यामुळे मुलगी लग्नाला तयार झाली असावी असे उन्निसाने पोलिसांना सांगितले. लग्नानंतर या शेखने नववधूसोबत चार दिवस हैदराबादमधल्या हॉटेलमध्ये मुक्कामाला केला. 

आणखी वाचा श्रीनगरमधील चौकात वंदे मातरमच्या घोषणा देणा-या 'त्या' महिलेला सुरेश रैनाचा सलाम'त्या' 10 दिवसाच्या बाळाला स्वतः आईनेच फेकलं नदीत

त्यानंतर मुलगी तीगलकुंटा येथील सिकंदरच्या घरी गेली तर, शेख ओमानला निघून गेला. मुलीला परत आणण्यासाठी मी अऩेकदार सिकंदरच्या घरी गेले पण त्याने मला धमकावून परत पाठवले. मुलगी सिकंदरकडे असताना त्याने मुलीला ओमानला पाठवण्यासाठी पासपोर्ट आणि अन्य कागदपत्रांची जमवाजमव केली आणि मुलीला ओमानला पाठवले. आरोपींवर गुन्हा दाखल करुन मुलीला मायदेशी परत आणावे अशी मागणी उन्निसाने केली आहे. 

पैशांच्या लोभामुळे मुलीला विकणारे पालक भारतातच नाही तर, परदेशातही आहेत. मागच्यावर्षी चीनमध्ये  आयफोन विकत घेण्यासाठी आपल्या 18 दिवसाच्या मुलीला ऑनलाइन विकल्याची धक्कादायक घटना घडली होती. पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली त्यानंतर  त्याला 3 वर्षाच्या कारागृहवासाची शिक्षा सुनावण्यात आली.