शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वाढदिवसादिवशीच १६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू, आई-वडिलांनी मृतदेहाजवळच कापला केक, कारण वाचून पाणावतील डोळे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2023 12:45 IST

Family News: दु:खद बाब  म्हणजे ज्या दिवशी या मुलाचा मृत्यू झाला, त्याच दिवशी त्याचा जन्मदिन होता. तसेच घरातही आनंदाचं वातावरण होतं. शोकाकुल आई वडिलांनी त्यानंतर केक कापून मुलाच्या पार्थिवाजवळ ठेवला. हे दृश्य पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.

गेल्या काही दिवसांमध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. अनेकांना डान्स करताना, व्यायाम करताना, खेळताना हृदयविकाराचा धक्का बसत आहे. तरुणांमध्येही हृदयविकाराच्या धक्क्याचे प्रमाण लक्षणीय आहे. यादरम्यान, हैदराबाद येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका विद्यार्थ्याचा वाढदिवसादिवशीच कार्डियक अरेस्टने मृत्यू झाला आहे. या विद्यार्थ्याचं वय केवळ १६ वर्षे एवढंच होतं. १९ मे रोजी हृदयविकाराचा धक्का आल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्याचा मृत्यू झाला. दु:खद बाब  म्हणजे ज्या दिवशी त्याचा मृत्यू झाला, त्याच दिवशी त्याचा जन्मदिन होता. तसेच घरातही आनंदाचं वातावरण होतं. शोकाकुल आई वडिलांनी त्यानंतर केक कापून मुलाच्या पार्थिवाजवळ ठेवला. हे दृश्य पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.

येथील बाबापूर गावातील दहावीतील विद्यार्थी असलेला सचिन १८ मे रोजी आपल्या जन्मदिनासाठी आसिफाबाद शहरामध्ये खरेदीसाठी गेला होता. बाजारात असताना अचानक त्याच्या छातीत दुखू लागले आणि तो तिथेच कोसळून पडला. त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र परिस्थिती खूपच बिघडल्याने त्याला सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. तिथे उपचारांदरम्यान, त्याचा मृत्यू झाला.

सचिनच्या पार्थिवाला गावात त्याच्या घरी आणण्यात आले. कुटुंबीयांनी या दु:खद वातावरणातही त्याच्या पार्थिवाजवळ केक कापला. यादरम्यान, त्याच्या आई-वडिलांना अश्रू अनावर झाले. त्यांनी तो केक मुलाच्या पार्थिवाजवळ ठेवला आणि मृतदेहाला मिठी मारून रडू लागले. हे दृश्य पाहून उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले.

केक कापल्यानंतर मुलांनी सचिनसाठी जन्मगीत गायले. तर स्थानिक ग्रामस्थांनी त्याच्या आठवणीमध्ये मेणबत्त्या पेटवल्या. सचिन त्याच्या वाढदिवसासाठी उत्सुक होता. तसेच यावेळी वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्याची त्याची इच्छा होती. मात्र त्याची ही इच्छा अपूर्णच राहिली. आनंदाच्या दिवशीच त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. सचिनच्या अंत्यसंस्कारासाठी संपूर्ण गाव जमला होता.  

टॅग्स :FamilyपरिवारDeathमृत्यूTelanganaतेलंगणा