१६... सारांश... जोड
By Admin | Updated: December 16, 2014 23:44 IST2014-12-16T23:44:14+5:302014-12-16T23:44:14+5:30
नंदापुरी शिवारात अवकाळी पाऊस

१६... सारांश... जोड
न दापुरी शिवारात अवकाळी पाऊसतारसा : मौदा तालुक्यातील नंदापुरी शिवारात सोमवारी सायंकाळी अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे कापणीला आलेला धान भिजला असून, शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आधीच धानाला कमी भाव मिळत असून, त्यात कोसळलेल्या या पावसामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.***धुक्यामुळे तूर, हरभरा पिके धोक्यातनरखेड : वातावरणातील बदल आणि धुक्यांमुळे तालुक्यातील तूर, हरभरा व फुलकोबीवर किडींचा प्रादुर्भाव व्हायला सुरुवात झाली आहे. शिवाय, वातावरणात गारठा वाढल्याने रात्रीच्या वेळी ओलित करण्याची समस्या शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे. ***गतिरोधक तयार करण्याची मागणीतारसा : नजीकच्या तारसा जॉईंट येथे रामटेक-मौदा, रामटेक-कन्हान, मौदा-अरोली व कन्हान-मौदा मार्ग एकत्र येतात. या मार्गावर सतत वर्दळ असून, वाहनांचा वेग अनियंत्रित असतो. त्यामुळे अपघात होत असल्याने येथे गतिरोधक तयार करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.***ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्यांची दैनावस्थासावनेर : तालुक्यातील अंतर्गत रस्त्यांवरून रेतीची मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक केली जाते. त्यामुळे रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे अपघात होत असून, दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने ही ओव्हरलोड वाहतूक कायमची बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.***