शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

चीन सीमेकडे निघालेला लष्कराचा ट्रक दरीत कोसळला, १६ जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 05:34 IST

सिक्कीममध्ये भीषण दुर्घटना, वळणावरील तीव्र उताराने केला घात, मृतांत ३ अधिकारी

नवी दिल्ली : उत्तर चीनच्या सीमेवरील चौकीकडे जवानांना घेऊन निघालेला लष्कराचा ट्रक उत्तर सिक्कीममधील झेमा येथे घाटात वळण घेतानाट्रक उतारावरून घसरल्याने दरीत कोसळला. या भीषण अपघातात तीन कनिष्ठ अधिकाऱ्यांसह १६ जवान मृत्युमुखी पडले. या दुर्दैवी अपघातामुळे देशभर शोक व्यक्त करण्यात येत आहे. 

लष्कराची तीन वाहने शुक्रवारी सकाळी जवानांना घेऊन जात होती. हा ताफा चांटे येथून थांगूच्या दिशेने निघाला होता. झेमा येथील घाटात वळण घेताना एक ट्रक तीव्र उतारावरून घसरून दरीत कोसळला. बचाव मोहीम तत्काळ सुरू करण्यात आली. चार जखमी जवानांना हेलिकॉप्टरने दरीतून बाहेर काढण्यात आले. 

संरक्षणमंत्र्यांच्या शोक संवेदना 

  • दुर्दैवाने या दुर्घटनेत ३ कनिष्ठ अधिकारी आणि १३ सैनिकांचा मृत्यू झाला. या दुःखाच्या प्रसंगी भारतीय लष्कर शोकाकुल कुटुंबांसोबत आहे,’ असे लष्कराने म्हटले. 
  • संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ‘त्यांच्या सेवेबद्दल व वचनबद्धतेबद्दल देश मनापासून कृतज्ञ आहे. शोकग्रस्त कुटुंबांप्रती माझ्या संवेदना’, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. 
  • जिथे हा ट्रक कोसळला तो भाग चीन सीमेपासून अगदी जवळ आहे. अवघड वळणे आणि तीव्र उतार यामुळे येथून वाहने चालवणे अवघड असते. 

सिक्कीमधील दुर्दैवी अपघातात देशाने काही जवानांना गमावले. मृतांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. जखमी झालेले जवान लवकर बरे व्हावेत, अशी मी प्रार्थना करतो. नरेंद्र मोदी, पंतप्रधान

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानNarendra Modiनरेंद्र मोदीRajnath Singhराजनाथ सिंह