१६ लाखांची रोकड जप्त
By Admin | Updated: September 29, 2014 07:19 IST2014-09-29T07:19:28+5:302014-09-29T07:19:28+5:30
चिमूर व सिंदेवाही येथे दोन वेगवेगळ्या भरारी पथकांनी वाहनांमधून १६ लाख ६५ हजार रुपयांची रोकड जप्त केली.

१६ लाखांची रोकड जप्त
चंद्रपूर : चिमूर व सिंदेवाही येथे दोन वेगवेगळ्या भरारी पथकांनी वाहनांमधून १६ लाख ६५ हजार रुपयांची रोकड जप्त केली. शनिवारी दुपारी ब्रह्मपुरी येथील प्रकाश तानबाजी भोले व त्यांचे सहकारी कारने ब्रह्मपुरी-हिंगणघाट मार्गाने येत असताना भरारी पथकाने चिमूरलगतच्या कान्पा नाक्यावर त्यांच्या वाहनाची तपासणी केली असता, प्रकाश भोले यांच्याजवळ १३ लाख रुपयांची रोकड आढळली. भरारी पथकाने रोकड जप्त केली. सिंदेवाही तालुक्यातील सरडपार येथील ढाब्याजवळ रविवारी दुपारी भरारी पथकाने एका सॅन्ट्रो कारमधून तीन लाख ६५ हजारांची रक्कम जप्त केली. ही रक्कम नागपूर येथील तांदूळ व्यापारी हेमंत हुमणे यांची आहे.