नवी दिल्ली : रशियाच्या लष्करामध्ये सैनिक म्हणून भरती झालेल्या भारतीयांना मायदेशी रवाना करावे, अशी मागणी भारताने केली आहे.
रशियाच्या लष्करात १२६ भारतीय सेवा बजावत असून, त्यातील १६ जण बेपत्ता आहेत तर १२ जणांचा मृत्यू झाला आहे. ही माहिती रशियाने भारताला कळविली आहे.
भारतीय परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, रशियात सैनिक म्हणून भरती झालेल्या भारतीयांपैकी ९६ जण मायदेशी परतले आहेत. त्यांना रशियाने लष्करी सेवेतून मुक्त केले आहे.