१६...जुगार
By Admin | Updated: December 16, 2014 23:44 IST2014-12-16T23:44:14+5:302014-12-16T23:44:14+5:30
(फोटो)

१६...जुगार
(फ ोटो)धामना शिवारातील जुगार अड्ड्यावर धाडपाच जणांना अटक : अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्तनागपूर : कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धामना शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी रात्री धाड टाकली. यात पाच जणांना जुगार खेळताना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून दोन लाख ४४ हजार ७९० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्रभाकर चिंतामण भुरभरे (४२, रा. धामना, ता. कुही), मनोज महादेव कापसे (३२, रा. न्यू नेहरूनगर, नागपूर), रविकांत ताजेश्वर नितनवरे (२५, रा. जुनी बिडीपेेठ, नागपूर), कैलास चंद्रभान नगराळे (४०, रा. चिकना, ता. कुही) या चौघांसह अन्य एकास अटक करण्यात आली. धामना शिवारात जुगार खेळला जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे पथकाने या शिवारात धाड टाकली. दरम्यान, त्यांना सदर सर्व जण जुगार खेळत असल्याचे आढळून आले. त्यांना लगेच ताब्यात घेत अटक करण्यात आली. त्यांच्याकडून २२ हजार ५६० रुपये रोख, दोन मोबाईल हॅण्डसेट, पाच मोटरसायकली, एक बॅटरी व जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण दोन लाख ४४ हजार ७६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले. सर्व आरोपींना कुही पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, या प्रकरणी कुही पोलिसांनी मुंबई जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर, सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर, उल्हास भुसारी, अमोल नागरे, संतोष, विशाल, रवींद्र, प्रीतेश, राधेश्याम कांबळे, शैलेश आदींनी केली. (प्रतिनिधी)***