१६... गुन्हे... जोड

By Admin | Updated: February 16, 2015 21:12 IST2015-02-16T21:12:02+5:302015-02-16T21:12:02+5:30

शेतीपयोगी साहित्य लंपास

16 ... crime ... attachment | १६... गुन्हे... जोड

१६... गुन्हे... जोड

तीपयोगी साहित्य लंपास
नरखेड : तालुक्यातील जलालखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या भिष्णूर शिवारातील शेतातून चोरट्यांनी १४,५०० रुपये किमतीचे शेतीपयोगी साहित्य चोरून नेले. ही घटना रविवारी मध्यरात्री घडली.
फिर्यादी नत्थू तुळशीराम गेडाम (५५, रा. भिष्णूर, ता. नरखेड) यांची भिष्णूर शिवारात शेती आहे. चोरट्यांनी त्यांच्या शेतातील विहिरीत असलेला मोटरपंप, स्टार्टर, पाईप आदी शेतीपयोगी साहित्य चोरून नेले. या साहित्याची एकूण किंमत १४,५०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी जलालखेडा पोलिसांनी भादंवि ३७९ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. (तालुका प्रतिनिधी)
***
चोरट्यास अटक
काटोल : पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिधोरा शिवारातील शेतातून पितळी नोझल चोरून नेल्याप्रकरणी काटोल पोलिसांनी चोरट्यास नुकतीच अटक केली. ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली होती.
उमेश पांडुरंग वाघाडे (३०, रा. रिधोरा, ता. काटोल) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. फिर्यादी दुनेश्वर शंकर जवंजाळ (५२, रा. रिधोरा, ता. काटोल) यांची रिधोरा शिवारात श्ेाती आहे. उमेशने त्यांच्या शेतातील २४ पितळी नोझल चोरून नेले होते. या नोझलची किंमत ९,६०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी काटोल पोलिसांनी भादंवि ३७९ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. सदर घटनेचा तपास अनिल महाजन करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)
***

Web Title: 16 ... crime ... attachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.