शिवरात्री मिरवणुकीतील १६ मुलांना विजेचा झटका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 08:59 AM2024-03-09T08:59:04+5:302024-03-09T09:00:45+5:30

मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी अपघातातील जखमींना शक्य ती सर्व वैद्यकीय मदत देण्याच्या योग्य सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

16 children in Shivratri procession electrocuted | शिवरात्री मिरवणुकीतील १६ मुलांना विजेचा झटका

शिवरात्री मिरवणुकीतील १६ मुलांना विजेचा झटका

कोटा/जयपूर :  राजस्थानमधील कोटा येथे महाशिवरात्रीनिमित्त शुक्रवारी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सहभागी झालेली १६ मुले विजेच्या तारेच्या संपर्कात आल्याने भाजली. 

मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी अपघातातील जखमींना शक्य ती सर्व वैद्यकीय मदत देण्याच्या योग्य सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, कुन्हडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सगतपुरा भागात १० ते १६ वर्षे वयोगटातील मुले कमी उंचीच्या ‘हाय टेंशन’ वीज तारेच्या संपर्कात आली. विजेच्या धक्क्याने एक मूल १०० टक्के भाजले तर दुसरे ५० टक्के भाजल्याचे त्यांनी सांगितले. 

सर्व जखमींना तातडीने कोटा येथील एमबीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोटा शहराच्या पोलिस अधीक्षक अमृता दुहान यांनी सांगितले की, ही घटना शुक्रवारी सकाळी ११:३० ते दुपारी १२ च्या दरम्यान कालीबस्ती येथून मिरवणूक जात असताना घडली.

Web Title: 16 children in Shivratri procession electrocuted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.