खरपुडीत ७ जागंसाठी १६ उमेदवार

By Admin | Updated: July 31, 2015 22:25 IST2015-07-31T22:25:17+5:302015-07-31T22:25:17+5:30

दावडी : येथील ग्रामपंचायतीच्या नऊ जागांपैकी दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित सात जागांसाठी सोळा उमेदवार रिंगणात आहेत. सरपंचपद ओबीसी महिला राखीव असून, या निवडणुकीत आजी-माजी सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी माघार घेतल्यामुळे सर्वच नवीन चेहरे निवडणुकीच्या आखाड्यात आहेत.

16 candidates for 7 seats in Kharududi | खरपुडीत ७ जागंसाठी १६ उमेदवार

खरपुडीत ७ जागंसाठी १६ उमेदवार

वडी : येथील ग्रामपंचायतीच्या नऊ जागांपैकी दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित सात जागांसाठी सोळा उमेदवार रिंगणात आहेत. सरपंचपद ओबीसी महिला राखीव असून, या निवडणुकीत आजी-माजी सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी माघार घेतल्यामुळे सर्वच नवीन चेहरे निवडणुकीच्या आखाड्यात आहेत.
कांताबाई घोडेकर, आशा भोगाडे या दोन महिला बिनविरोध निवडून आल्या आहेत. सरपंच दादाभाऊ खंडागळे, उपसरपंच जयसिंग भोगाडे, कैलास चौधरी पाटील, नंदा चौधरी, रोहिदास गायकवाड यांनी या निवडणुकीत माघार घेतली आहे. गावकी व भावकीच्या राजकारणात चांगलीच रस्सीखेच सुरु आहे. या निवडणुकीत आपणच निवडून येणार असा दावा प्रत्येक उमेदवार करत आहे. विलास बाळासाहेब चौधरी पाटील, बबन बाजीराव भोगाडे, स्वाती विशाल बरबटे, प्रतिभा रविंद्र गरुड, रविंद्र सोपान चौधरी, संगीता शरद काशिद, संदीप काशिनाथ काशिद, मंदा शिवाजी चौधरी, सुमित दशरथ भोगाडे, कल्पना सचिन दाभाडे, सुरेखा अनिल शिंदे, अलका कृष्णा निकाळजे, सत्यभामा रोहिदास काशिद, आबा रघुनाथ चौधरी, राजू खंडू बरबटे, जनाबाई भाऊसाहेब भिसे हे उमेदवार रिंगणात आहेत.

Web Title: 16 candidates for 7 seats in Kharududi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.