बँकेतल्या पाचव्या रोख व्यवहारापासून 150 रुपये आकार लागणार
By Admin | Updated: February 7, 2017 19:59 IST2017-02-07T18:41:37+5:302017-02-07T19:59:28+5:30
ग्राहकांनी रोखीचे व्यवहार करू नयेत या उद्देशाने आता बँकेमधून करण्यात येणाऱ्या मोफत रोख व्यवहारांवरही बंधने आणण्यात आली आहेत

बँकेतल्या पाचव्या रोख व्यवहारापासून 150 रुपये आकार लागणार
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - ग्राहकांनी रोखीचे व्यवहार करू नयेत या उद्देशाने आता बँकेमधून करण्यात येणाऱ्या मोफत रोख व्यवहारांवरही बंधने आणण्यात आली आहेत. सध्या बँकेमधून रोखीने पैसे काढायचे असतील वा जमा करायचे असतील तर पाच ट्रॅन्झॅक्शनपर्यंत ही सेवा मोफत होती व सहाव्यापासून प्रत्येक व्यवहारासाठी 100 रुपये आकार होता. आता, 4 व्यवहार मोफत असून पाचव्या व्यवहारापासून 150 रुपयांचा आकार द्यावा लागणार आहे. हे बदल 1 मार्च 2017 पासून लागू होणार आहेत.
शिवाय, बँकेतून पैसे काढताना प्रतिदीन 50,000 रुपये याप्रमाणे महिन्याला 15 लाख रुपये रक्कम काढता येणे शक्य होते. मात्र, आता महिन्याभरात मोफत पैसे काढण्याची मर्यादा 2 लाख रुपये करण्यात येत आहे. या संदर्भातील बदल एचडीएफसी बँकेने जाहीर केले असून, अन्य बँकांच्या दरांमध्येही वाढ होईल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे ग्राहक जास्त प्रमाणात डिजिटल व्यवहारांकडे वळतील अशी अपेक्षा आहे.
या संदर्भातील एचडीएफसी बँकेच्या वेबसाइटवरील नोटीस...