शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

केजीमध्ये ‘ढ’ ठरलेला निर्भय १५व्या वर्षी इंजिनीअर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 01:11 IST

इतर मुले जेव्हा इयत्ता १०वीची शालांत परीक्षा देण्याची तयारी करत असतात, तेव्हा निर्भय ठक्कर या विद्यार्थ्याने बीई (इलेक्ट्रिकल) ही अभियांत्रिकी पदवी मिळविली आहे.

अहमदाबाद : इतर मुले जेव्हा इयत्ता १०वीची शालांत परीक्षा देण्याची तयारी करत असतात, तेव्हा निर्भय ठक्कर या विद्यार्थ्याने बीई (इलेक्ट्रिकल) ही अभियांत्रिकी पदवी मिळविली आहे. विशेष म्हणजे, सीनियर केजीच्या वर्गात असताना शिक्षकांनी अभ्यासात ‘कच्चा’ असल्याचा शेरा दिलेला निर्भय गुजरात तंत्रज्ञान विद्यापीठाचा सर्वाततरुण अभियांत्रिकी पदवीधर झाला आहे!निर्भयचे वडील धवल ठक्कर हेही अभियंते असून, त्याची आई डॉक्टर आहे. वडील जामनगर येथे एका खासगी कंपनीत नोकरीस होते, तेव्हा तेथे शिकत असताना निर्भयचे हे झटपट शिक्षण इयत्ता आठवीपासून सुरू झाले. गुजरात राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमानुसार इयत्ता सातवी उत्तीर्ण झाल्यानंतर, निर्भयने ‘केंब्रिज इंटरनॅशनल एक्झामिनेशन्स’तर्फे घेतल्या जाणाºया इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतच्या परीक्षा सहा महिन्यांत पूर्ण केल्या. त्यानंतर इयत्ता ११ वी व १२ वीच्या परीक्षा तो पुढील अवघ्या तीन महिन्यांत उत्तीर्ण झाला.एवढ्या लहान वयात अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमास प्रवेश मिळविण्यासाठी निर्भयच्या आई-वडिलांना अ. भा. तंत्रशिक्षण परिषदेच्या विशेष समितीकडे त्याची असमान्य पात्रता पटवून द्यावी लागली. अशा विशेष प्रवेशास ‘जीटीयू’ म्हटले जाते. एसएएल अभियांत्रिकी महाविद्यालयातून निर्भयने अभियांत्रिकीचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला.या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रूपेश वसानी यांनी सांगितले की, शिक्षकांच्या मदतीने आम्ही निर्भयसाठी खास ‘फास्ट ट्रॅक’ अभ्यासक्रम तयार केला. हा अभ्यासक्रम ‘क्रेडिट’ पद्धतीचा होता. ‘जीटीयू’ निकषांनुसार फक्त निर्भयसाठी वेगळ््या प्रश्नपत्रिका तयार करून त्याच्या परीक्षा घेतल्या गेल्या व निकाल जाहीर केले गेले.आपल्या मुलावर संपूर्ण लक्ष केंद्रित करता यावे यासाठी धवल ठक्कर यांनी वयाच्या ३६ व्या वर्षी नोकरी सोडली. आज निर्भयने हे धवल यश संपादन केल्यावर मागे वळून पाहताना धवल ठक्कर म्हणाले, सीनियर केजीमध्ये शिक्षकांनी निर्भयला अभ्यासात कच्चा ठरविले तेव्हा मला आश्चर्य वाटले व मी मुलाच्या शिक्षणासाठी पूर्ण वेळ लक्ष देण्याचे ठरविले. पारंपरिक परीक्षा पद्धतीत मुलांच्या फक्त घोकंपट्टीचा कस लागतो. आम्ही निर्भयच्या मनातून मार्कांची भीती पार निघून जाईल अशी अध्यापन पद्धती अनुसरली.त्यात केवळ वाचन आणि ऐकणे एवढेच नव्हते तर नाविन्यपूर्ण कल्पना करणे आणि त्या कल्पना प्रत्यक्षात उतरविण्याचे व्यवहार्य मार्ग शोधणे यावर भर होता.सभोवतालच्या जगाकडे डोळसपणे पाहण्याची दृष्टी वडिलांनी दिली त्याचा हा सर्व अभ्यास करताना खूप उपयोग झाला, असे निर्भय सांगतो. तो म्हणतो की, अभियांत्रिकी पदवी हा केवळ पायचा दगड आहे. पुढे जाऊन संशोधन आणि नव्या उत्पादनांचा विकास करण्याचा माझा मानस आहे, असे निर्भय म्हणाला.कॉलेजमध्ये असताना दिवसाचे नऊ तास अभ्यास करणारा निर्भय फावल्या वेळात विरंगुळा म्हणून फूटबॉल व बुद्धिबळ खेळतो आणि पोहोतो.अभियांत्रिकीमध्ये अनेक विषय सामायिक असतात. त्यामुळे पुढील तीन वर्षांत विविध १० शाखांच्या अभियांत्रिकी पदव्या मिळविण्याचा मी प्रयत्न करणार आहे.-निर्भय ठक्कर, सर्वात तरुण अभियंताकोणतेही मूल अभ्यासात कच्चे किंवा हुशार नसते. तुम्ही त्याचे मन कसे घडविता आणि त्याला दैनंदिन व्यवहारातून अभ्यास करायला कसे शिकविता, यावर सर्व अवलंबून आहे.- धवल ठक्कर,निर्भयचे वडील