१५... रेती

By Admin | Updated: February 15, 2015 22:36 IST2015-02-15T22:36:35+5:302015-02-15T22:36:35+5:30

(फोटो)

15 ... sand | १५... रेती

१५... रेती

(फ
ोटो)
१७ लाखांचा मुद्देमाल जप्त
अवैध रेती वाहतूक : सिर्सी, पेंडकापार व भारसिंगी परिसरात कारवाई
नागपूर : जिल्ह्यातील बेला व जलालखेडा पोलिसांनी त्यांच्या हद्दीतील सिर्सी, पेंडकापार व भारसिंगी परिसरात केलेल्या कारवाईमध्ये अवैध रेती वाहतुकीचे तीन ट्रॅक्टर पकडले. यात १७ लाख सहा हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तिघांना अटक करण्यात आली. ही कारवाई शनिवारी करण्यात आली.
बेला पोलिसांनी शनिवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास सिर्सी शिवारातील वाहनांवर नजर ठेवली होती. दरम्यान, एमएच-३२/एन-९४०९ क्रमांकाच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये रेती असल्याचे आढळून येताच पोलिसांनी कागदपत्रांची तपासणी केली. त्यास सदर रेती विना रॉयल्टी असल्याचे स्पष्ट होताच रेतीसह ट्रॅक्टर जप्त करण्यात आला. या कारवाईत सहा लाख एक हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी निखील चिंतामण बुुराडे, रा. गिरड, जिल्हा वर्धा यास अटक केली असून, जावेद अब्दुल पटेल, रा. समुद्रपूर, जिल्हा वर्धा याचा शोध सुरू आहे.
बेला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंडकापार शिवारात शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास कारवाई करण्यात आली. त्यात पोलिसांना एमएच-४०/ए-२७५१ क्रमांकाच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये विना रॉयल्टी रेती आढळून येताच रेतीसह ट्रॅक्टर जप्त केला. या कारवाईमध्ये सहा लाख एक हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज जप्त केला असून, तुळशीराम बळीराम तिमांडे व गजानन पांडुरंग दांडवे दोघेही रा. बेला, ता. उमरेड या दोघांना अटक करण्यात आली.
जलालखेडा पोलिसांनी शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास भारसिंगी शिवारात कारवाई करून अवैध रेती वाहतुकीचा ट्रॅक्टर पकडला. या परिसरात पोलिसांना एमएच-३१/एजी-२३२६ क्रमांकाच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये विना रॉयल्टी रेती असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ट्रॅक्टरसह रेती जप्त करण्यात आली. या कारवाईमध्ये एकूण पाच लाख तीन हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी भादंवि ३७९, १०९ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. (प्रतिनिधी)
***

Web Title: 15 ... sand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.