१५... कोराडी
By Admin | Updated: February 15, 2015 22:36 IST2015-02-15T22:36:11+5:302015-02-15T22:36:11+5:30
(फोटो)

१५... कोराडी
(फ ोटो)महामार्गावरील पथदिवे सुरूपहिला टप्पा : कोराडी : नागपूर - बैतुल या महामार्गाचे चौपदरीकरण नुकतेच पूर्ण करण्यात आले असून, त्या महामार्गावर पथदिवे लावण्यात आले होते. मात्र, ते मागील सहा महिन्यांपासून बंद होते. ते अखेर सुरू करण्यात आले.नागपूर - बैतुल या महामार्गावर पथदिवे लावण्यात आले आहेत. ते मागील सहा महिन्यांपासून बंद असल्याने सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. त्या अनुषंगाने लोकमतमध्ये वारंवार वृत्त प्रकाशित करण्यात आले. त्या वृत्ताची दखल घेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सदर हायमास्ट पथदिवे तत्काळ सुरू करण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते. दरम्यान, कोराडी टी पॉईंट ते विस्तारीत वीज प्रकल्पादरम्यानचे पहिल्या टप्प्यातील पथदिवे सुरू करण्यात आले. पालकमंत्री बावनकुळे यांनी कळ दाबून सदर पथदिवे सुरू केले. यावेळी महादुला नगर पंचायत अध्यक्ष कांचन कुथे, नगर पंचायत उपाध्यक्ष राजेश रंगारी, राम तोडवाल, भाऊराव गोमासे, किशोर शर्मा, विलास तभाणे, शांता सोनवणे, नलिनी धूळस, सीमा जयस्वाल, ज्ञानोबा सोनवणे, अरुण उजवणे, राजेश नागलेकर, संजय भोंगाडे आदी उपस्थित होते. या मार्गावरील सर्व पथदिवे टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. विस्तारीत वीज प्रकल्पासमोर अंधारामुळे काही अपघात झाले. त्यात चौघांचा मृत्यू झाला. त्यामुळे या मार्गावरील पथदिवे त्वरित सुरू करण्याची मागणी रत्नदीप रंगारी, संजय टेकाडे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी केली होती. शिवाय, त्यंानी या संदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहारही केला होता. (वार्ताहर)***