शहरं
Join us  
Trending Stories
1
तालिबान-पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्ध, कुर्रममध्ये टँक नष्ट, चौक्या ताब्यात, दोन टीटीपी कमांडर पाकिस्तानविरुद्ध एकत्र आले
2
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
3
५ वर्षात ₹१७ लाखांचा रिटर्न; पैसा छापायची मशीन आहे पोस्टाची 'ही' स्कीम, बनवेल लखपती
4
सिलिंडरच्या स्फोटात भाजली, ११ दिवस मृत्यूशी झुंज; भारतीची शेवटची इच्छा वाचून पाणावतील डोळे
5
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
6
दिवाळीत वैभव लक्ष्मी योग: ९ राशींवर महाकृपा, धन-संपत्ती-लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, यश-शुभ काळ!
7
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, निफ्टीत ८० अंकांची तेजी; NBFC शेअर्समध्ये जोरदार तेजी
8
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
9
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
10
भयंकर! शाळेत चप्पल घातल्याने मुख्याध्यापिका संतापली; कानाखाली मारली, विद्यार्थिनीचा मृत्यू
11
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
12
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
13
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
14
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
15
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
16
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
17
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
18
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
19
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
20
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...

केरळमध्ये ISIS चे 15 दहशतवादी घुसण्याच्या तयारीत, सुरक्षा यंत्रणा सतर्क 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 11:01 IST

आयएसआयएसचे सुमारे 15 दहशतावादी घुसण्याच्या तयारीत असल्याची भीती गुप्तहेर खात्याने वर्तवली आहे.

तिरुवनंतपुरम - श्रीलंकेमध्ये आयएसआयएसच्या दहशतवाद्यांनी एप्रिल महिन्यात साखळी बॉम्बस्फोट घडवून शेकडो बळी घेतले होते. ही घटना ताजी असतानाचा आता आयएसआयएसचे सुमारे 15 दहशतावादी घुसण्याच्या तयारीत असल्याची भीती गुप्तहेर खात्याने वर्तवली आहे. सुमारे 15 दहशतवादी नौकेत स्वार होऊन लक्षद्वीपकडे रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस खात्यामधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांच्या हालचालींबाबत असे अलर्ट नेहमीच येत असतात. मात्र यावेळी दहशतवाद्यांची नेमकी संख्याही सांगण्यात आली आहे. त्यामुळे आम्ही या इशाऱ्याकडे गांभीर्याने पाहत आहोत. तसेच किनारपट्टी भागात बंदोबस्त वाढवल आहे. 21 एप्रिल रोजी ईस्टर संडेच्या दिवशी श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनंतर दक्षिण भारतात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. मात्र श्रीलंकेतून आलेल्या या अलर्टनंतर 23 मेपासून सुरक्षा व्यवस्थेत अधिकच वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, केरळमध्ये अद्यापही आयएसच्या समर्थकांचे अस्तित्व असल्याचा गुप्तहेर यंत्रणांना संशय आहे. इराक आणि सीरियामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या आयएसचा या दोन्ही देशांमधून सफाया करण्यात आला आहे. मात्र आता दक्षिणा आशियामध्ये पाळेमुळे पसरवण्यासाठी आयएसकडून प्रयत्न सुरू आहेत. 

टॅग्स :ISISइसिसterroristदहशतवादीTerrorismदहशतवादKeralaकेरळ