तेलंगणमध्ये अपघात, महाराष्ट्रातील पंधरा जणांचा मृत्यू

By Admin | Updated: May 15, 2016 10:23 IST2016-05-15T10:19:30+5:302016-05-15T10:23:53+5:30

तेलंगणच्या अदिलाबाद जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्री ट्रक आणि ऑटो रिक्षाच्या झालेल्या भीषण अपघातात महाराष्ट्रातील एकाच कुटुंबातील पंधरा जणांचा मृत्यू झाला.

15 deaths in Telangan, 15 deaths in Maharashtra | तेलंगणमध्ये अपघात, महाराष्ट्रातील पंधरा जणांचा मृत्यू

तेलंगणमध्ये अपघात, महाराष्ट्रातील पंधरा जणांचा मृत्यू

ऑनलाइन लोकमत 

अदिलाबाद, दि. १५ - तेलंगणच्या अदिलाबाद जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्री ट्रक आणि ऑटो रिक्षाच्या झालेल्या  भीषण अपघातात महाराष्ट्रातील एकाच कुटुंबातील पंधरा जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील हे कुटुंब होते. मृतांमध्ये पाच महिला आणि सात लहान मुलांचा समावेश आहे. 
 
अदिलाबादमधील बहिनसा येथे हा अपघात झाला. खडीने भरलेल्या ट्रकने समोरुन येणा-या ऑटो रिक्षाला जोरदार धडक दिली. ऑटोमध्ये १८ प्रवासी होते अशी माहिती अदिलाबाद पोलिसांनी दिली. अपघात इतका भीषण होता की, १४ जणांचा जागीच मृत्यू झाला. एकाचा रुग्णालयाच्या वाटेवर असताना मृत्यू झाला. तिघा जखमींना निझामाबाद जिल्ह्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
 
रिक्षामधील सर्व प्रवासी मंदिरात देवदर्शनासाठी चालले असताना ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये पाच महिला, चार मुलगे आणि तीन मुली आहेत अशी माहिती बहिनसा ग्रामीण पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक विनोद रेड्डी यांनी दिली. 
 

Web Title: 15 deaths in Telangan, 15 deaths in Maharashtra