१५... गुन्हे... जोड

By Admin | Updated: February 15, 2015 22:36 IST2015-02-15T22:36:27+5:302015-02-15T22:36:27+5:30

घरगुती वादातून पत्नीस मारहाण

15 ... criminals ... attachments | १५... गुन्हे... जोड

१५... गुन्हे... जोड

गुती वादातून पत्नीस मारहाण
काटोल : घरगुती वादातून पतीने पत्नीस मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना काटोल शहरातील गळपुरा येथे शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणातील आरोपी पतीस पोलिसांनी अटक केली.
अनिता संजय सुरजुसे (२४, रा. गळपुरा, काटोल) असे गंभीर जखमी पत्नीचे नाव असून, सुनील रमेश सुरजुसे (३४, रा. गळपुरा, काटोल) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. या पती-पत्नीमध्ये शुक्रवारी दुपारी वाद उद्भवला. त्यातच राग अनावर झाल्याने सुनीलने अनिताला मारहाण करायला सुरुवात केली. वाद विकोपास गेल्याने त्याने अनिताच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून तिला गंभीर जखमी केले. तिला काटोल येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. या प्रकरणी काटोल पोलिसांनी भादंवि ३२४ अन्वये गुन्हा नोंदवून आरोपी पतीस अटक केली. सदर घटनेचा तपास सहायक फौजदार गाढवे करीत आहे.
***
दारूच्या वादातून नोकरास मारहाण
खापरखेडा : दारू विकत घेण्यातून वाद उद्भवल्याने दोघंानी दारूच्या दुकानात काम करणाऱ्यास काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोटा येथे शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.
जगन्नाथ लसीराम केसकर (४३, रा. सिल्लेवाडा, ता. सावनेर) असे जखमीचे नाव असून, गोलू ऊर्फ लव संतोष सिन्हा (२३) व कुश संतोष सिन्हा (१८) दोघेही रा. पोटा, ता. सावनेर अशी आरोपींची नावे आहेत. जगन्नाथ हा पोटा येथील दारूच्या दुकानात काम करतो. गोलू व कुुश शुक्रवारी सकाळी त्याच्या दुकानात दारू विकत घेण्यासाठी गेले. दारू विकत घेतल्यानंतर त्यांनी जगन्नाथना पाच रुपये परत मागितले. त्यावरून त्यांच्यात वाद निर्माण झाला. दरम्यान, या दोघांनी जगन्नाथला काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी भादंवि ३२४, ३४ अन्वये गुन्हा नोंदवून दोन्ही आरोपींना अटक केली. सदर घटनेचा तपास पोलीस हवालदार जुनघरे करीत आहे.
***

Web Title: 15 ... criminals ... attachments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.