१५... बेला... आग

By Admin | Updated: February 16, 2015 21:11 IST2015-02-16T21:11:59+5:302015-02-16T21:11:59+5:30

(फोटो)

15 ... Bela ... fire | १५... बेला... आग

१५... बेला... आग

(फ
ोटो)
धावत्या व्हॅनने घेतला पेट
तरुण गंभीर जखमी : सिर्सीनजीकची घटना
बेला : भरधाव मारुती व्हॅनने अचानक पेट घेतला. यात एक तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना बेला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमरेड-गिरड मार्गावरील सिर्सी शिवारात सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.
अनवर युसूफ खाँ पठाण असे गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे. विशेष म्हणजे, अनवर हा अपंग असून, तो यात अंदाजे ६० टक्के भाजला. चालक किशोर दिगांबर थूल, छाया वामनराव तुपे, त्यांच्या दोन मुली, प्रकाश महाजन व अनवर आदी एमएच-३५/ई-१६७७ क्रमांकाच्या मारुती व्हॅनने गोंदिया जिल्ह्यातील प्रतापगड येथे जात होते. व्हॅनमधील सर्व जण दुकानदार असून, प्रतापगड येथे महाशिवरात्रीनिमित्त मोठी यात्रा भरत असल्याने तिथे ते दुकान थाटण्यासाठी जात असल्याची माहिती जाणकारांनी दिली. दरम्यान, सिर्सी परिसरात सदर व्हॅनने अचानक पेट घेतला. आग लागल्याचे लक्षात येताच व्हॅनमधील सर्वांनी पटापट उड्या घेत पळ काढला. मात्र, अनवर हा अपंग असल्याने त्याला वेळीच उडी मारून बाहेर येणे शक्य झाले नाही. त्यामुळे तो यात ६० टक्के भाजला.
माहिती मिळताच सिर्सी येथील अखिल रोडे, अफसर पठाण, यशवंत वरभे, प्रदीप गावंडे, प्रमोद कारमोरे यांनी समयसूचकता बाळगत अनवरला बाहेर काढले आणि त्याला लगेच सिर्सी येथील प्राथ्िामक आरोग्य केंद्रात नेले. तिथे त्याच्यावर प्रथमोपचार केल्यानंतर नागपूरला हलविण्यात आले. या व्हॅनने नेमका कशामुळे पेट घेतला, हे कळू शकले नाही. (वार्ताहर)
***

Web Title: 15 ... Bela ... fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.