शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तारीख पे तारीख! कोर्टात 60 वर्षांपासून प्रलंबित आहेत 140 खटले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 10:02 IST

न्यायाला विलंब होणे म्हणजे न्याय नाकारण्यासारखे आहे, असे म्हटले जाते. मात्र भारतातील विविध न्यायालयांमध्ये अनेक खटले वर्षांनुवर्षे प्रलंबित आहेत.

ठळक मुद्दे भारतातील विविध न्यायालयांमध्ये अनेक खटले वर्षांनुवर्षे प्रलंबित आहेतदेशातील विविध कनिष्ठ न्यायालयांमध्ये सुमारे 140 खटले हे तब्बल 60 वर्षांपासून प्रलंबित असल्याचे उघडकीस आले आहेसध्या देशातील प्रलंबित खटल्यांची संख्या 2.9 कोटींपर्यंत पोहोचली आहे. यापैकी 71 टक्के फौजदारी खटले आहेतप्रलंबित खटल्यांमध्ये सर्वाधिक खटले उत्तर प्रदेशमधील, त्याखालोखाल महाराष्ट्राचा नंबर

नवी दिल्ली - न्यायाला विलंब होणे म्हणजे न्याय नाकारण्यासारखे आहे, असे म्हटले जाते. मात्र भारतातील विविध न्यायालयांमध्ये अनेक खटले वर्षांनुवर्षे प्रलंबित आहेत. अनेक वर्षे प्रलंबित राहिलेले खटले ही भारतीय न्यायव्यवस्थेसमोरील गंभीर आव्हान बनले आहे.  दरम्यान, न्यायाच्या अपेक्षेने न्यायालयात धाव घेणाऱ्या सर्वसामान्यांना कित्येक वर्षांपर्यंत वाट पाहावी लागते, याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त हिंदी संकेतस्थळ नवभारत टाइम्सने प्रकाशित केले आहे. देशातील विविध कनिष्ठ न्यायालयांमध्ये सुमारे 140 खटले हे तब्बल 60 वर्षांपासून प्रलंबित असल्याचे उघडकीस आले आहे. तसेच जिल्हा आणि इतर न्यायालयांमध्ये सुमारे 66 हजार खटले हे 30 किंवा अधिक वर्षांपासून प्रलंबित आहेत. तर सुमारे 60 लाख खटले हे पाच वर्षांहून अधिक काळापासून सुरू आहेत.  बक्सर येथील राहुल पाठक यांचा खटला प्रलंबित खटल्यांचे एक उदाहरण आहे.  दरम्यान, सरकारने हल्लीच केलेल्या अभ्यासानुसार सध्या न्यायालयात प्रलंबित असलेले खटले ज्या प्रकारे निकाली काढण्यात येत आहेत. त्यांचा वेग पाहता सर्व खटले निकाली काढण्यासाठी सुमारे 324 वर्षे लागतील.  सध्या देशातील प्रलंबित खटल्यांची संख्या 2.9 कोटींपर्यंत पोहोचली आहे. यापैकी 71 टक्के फौजदारी खटले असून, यातील बहुतांश आरोपी सध्या अंडर ट्रायल आहेत.  न्यायालयामध्ये दर महिन्याला लाखो खटले दाखल होत असून, गेल्या महिन्यातच सुमारे 10.2 लाख खटले न्यायालयासमोर आले आहेत. त्यापैकी केवळ 8 लाख खटले निकाली निघाले असून, 2.2 लाख खटले प्रलंबित झाले आहेत. प्रलंबित खटल्यांमध्ये सर्वाधिक खटले उत्तर प्रदेशमधील असून,  येथे सुमारे 26 हजार खटले प्रलंबित आहेत. त्याखालोखाल महाराष्ट्राचा नंबर लागत असून, महाराष्ट्रामधील 13 हजार खटले प्रलंबित आहेत. तसेच एकूण प्रलंबित खटल्यांपैकी 96 टक्के खटले हे उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार, गुजरात आणि ओदिशा या राज्यातील आहेत.  

टॅग्स :Courtन्यायालयIndiaभारत